Akola: विदर्भात ४२६ किमी अंतराची नदी,कालव्याचे हाेणार निर्माण, आ.सावरकर यांची माहिती

By आशीष गावंडे | Published: July 6, 2024 08:42 PM2024-07-06T20:42:15+5:302024-07-06T20:42:24+5:30

Akola News: शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत राज्य शासनाकडून अनेक माेठे प्रकल्प,याेजना निकाली काढली जात आहेत. पावसाळ्यात भंडारा जिल्ह्यातील गाेसेखुर्द धरणातून माेठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या पाण्याचा विदर्भातील आठ जिल्ह्यांत शेतीच्या सिंचनासाठी वापर करण्याच्या उद्देशातून नव्याने नदी व कालव्याचे निर्माण करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाकडून राबविला जाणार आहे.

Akola: Construction of 426 km long river and canal in Vidarbha, information of A. Savarkar | Akola: विदर्भात ४२६ किमी अंतराची नदी,कालव्याचे हाेणार निर्माण, आ.सावरकर यांची माहिती

Akola: विदर्भात ४२६ किमी अंतराची नदी,कालव्याचे हाेणार निर्माण, आ.सावरकर यांची माहिती

- आशिष गावंडे 
अकाेला - शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत राज्य शासनाकडून अनेक माेठे प्रकल्प,याेजना निकाली काढली जात आहेत. पावसाळ्यात भंडारा जिल्ह्यातील गाेसेखुर्द धरणातून माेठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या पाण्याचा विदर्भातील आठ जिल्ह्यांत शेतीच्या सिंचनासाठी वापर करण्याच्या उद्देशातून नव्याने नदी व कालव्याचे निर्माण करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाकडून राबविला जाणार आहे. यामुळे अकाेला जिल्ह्यासह आठ जिल्ह्यातील हजाराे हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक याेजना व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. यामध्ये शेतकरी, उद्याेजक, व्यापारी, कष्टकरी महिला, बेराेजगार तरुणांसह युवतींसाठी अनेक याेजनांचा समावेश आहे. शासनाच्या महसुली उत्पन्नात वाढ झाल्यामुळे यातूनच यासर्व प्रकल्प व याेजनांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आषाढीला पंढरपूरसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना रस्त्यात आराेग्य सुविधा देण्यासाठी निर्मल वारी याेजनेंतर्गत ३६ काेटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण याेजनेच्या अटी व निकष शिथील केले असून ३१ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. पिंक ऑटाे रिक्षा, १० लाख युवकांना राेजगार,मुख्यमंत्री अन्नपूर्णा याेजनेच्या माध्यमातून पात्र कुटुुंबाला तीन सिलींडर माेफत, महापालिका क्षेत्रात इलेक्ट्रिक बस सेवा अशा विविध नाविन्यपूर्ण याेजनांची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती आ. रणधीर सावरकर यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला खासदार अनुप धाेत्रे, जिल्हाध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापाैर विजय अग्रवाल उपस्थित हाेते. 
 
जिल्ह्यात १ हजार एकर जमिनीवर साैरप्रकल्प
शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून जिल्ह्यातील शासकीय एक हजार एकर जमिनीवर साैर उर्जा प्रकल्प उभारल्या जाणार असल्याची माहिती आ.सावरकर यांनी दिली. या प्रकल्पातून तयार हाेणाऱ्या वीजेचा पुरवठा शेतकरी,उद्याेजकांना केला जाइल.
 
अकाेला ते खंडवा ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्ग
मध्य प्रदेशला जाेडण्यासाठी अकाेला ते खंडवा ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु केल्याची माहिती खासदार अनुप धाेत्रे यांनी दिली. या महामार्गावरुन इंदाैर अवघ्या तीन तासांत गाठता येइल. यासह अकाेला ते नांदेड,अकाेला ते अकाेट जाण्यासाठी शहराबाहेरुन बायपास देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केल्याचे खा.धाेत्रे यांनी सांगितले.

Web Title: Akola: Construction of 426 km long river and canal in Vidarbha, information of A. Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला