Akola: अकाेल्यात सहकार, अकाेटात कास्तकार, बार्शीटाकळीत शेतकरी पॅनलकडे कल
By राजेश शेगोकार | Published: April 29, 2023 11:41 AM2023-04-29T11:41:20+5:302023-04-29T11:41:36+5:30
Akola: अकाेला जिल्हयातील तीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर शनिवारी सकाळी मतमाेजणी सुरू झाली. अकाेल्यात सहकार पॅनलची सत्ता अबाधीत राहण्याचे संकेत असून अकाेटात कास्तकार पॅनलकडे मतदारांचा कल झुकल्याचे मतमाेजणीतील फेरीत दिसून आले.
- राजेश शेगाेकार
अकाेला - जिल्हयातील तीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर शनिवारी सकाळी मतमाेजणी सुरू झाली. अकाेल्यात सहकार पॅनलची सत्ता अबाधीत राहण्याचे संकेत असून अकाेटात कास्तकार पॅनलकडे मतदारांचा कल झुकल्याचे मतमाेजणीतील फेरीत दिसून आले. बार्शीटाकळीमध्ये शेतकरी परिवर्तन पॅनलला कल असल्याचे दिसत आहे.
तिन्ही बाजार समितीत रिंगणात असलेल्या सर्वच पॅनलमधील उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली हाेती अकाेल्यात सहकार पॅनलमध्ये वंचित बहूजन आघाडी वगळता सर्वच पक्षाच्या नेत्यांचा सहभाग हाेता. या पॅनलचे मतमाेजणी वर्चस्व दिसून आले. या पॅनलमधील शिवसेनेचे चारही सदस्य विजयी झाले आहेत. बार्शीटाकळीत शेतकरी परिवर्तन पॅनलचे तीन सदस्य निवडून आले असून मतमाेजणी सुरू आहे. या पॅनलमध्ये वंचित बहूजन आघाडीचे वर्चस्व हाेते अकाेटात कास्तकार पॅनलकडे मतदारांचा कल असल्याचे दिसत आहे. मतमाेजणी सुरू असून अवघ्या तासाभरात अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान तेल्हारा, पातूर, मूर्तिजापूर व बाळापूर या बाजार समित्यांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.