अकोला: यंदाच्या कावड महोत्सवावर कोरोनाचे सावट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:59 AM2020-07-11T10:59:59+5:302020-07-11T11:00:15+5:30
यंदा कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता, या महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- आशिष गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. येत्या २१ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून, १७ आॅगस्ट रोजी शेवटचा श्रावण सोमवार आहे. यंदा कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता, या महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू तसेच जिल्हा प्रशासन कोणता निर्णय घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. श्रावण महिन्याला प्रारंभ होण्यापूर्वीच या महोत्सवात सहभागी होणाºया शिवभक्तांना कावडच्या तयारीचे वेध लागतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून चहा, नाश्ता, फराळ आदी व्यवस्था उभारतात. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातील भाविक अकोल्यात दाखल होत असतात. येत्या २१ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होणार असून, यंदा संसर्गजन्य कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता पालखी व कावडचे आयोजन करणाºया शिवभक्त मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी एकमेक ांच्या संपर्कात न येण्याची नियमावली असल्यामुळे कावड महोत्सवात हजारोंच्या संख्येने असलेले पालखी व कावडधारी शिवभक्त कसे एकत्र येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थातच, देशावर आलेले कोरोनाचे संकट व मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू व जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतात, याकडे शिवभक्तांचे लक्ष लागले आहे.
अकोलेकरांच्या हिताचा व्हावा विचार
पावसाळ््यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शहरातील प्रमुख गणेश मंडळांसोबत संवाद साधत सार्वजनिक उत्सव छोटेखानी स्वरूपात आयोजित करण्याचे आवाहन केले होते.
ही बाब पाहता पालकमंत्री ना.बच्चू कडू यांनीसुद्धा अकोलेकरांच्या हिताचा विचार करूनच ठोस निर्णय घ्यावा, असा सूर पालखी व कावडधारी शिवभक्तांमधून उमटू लागला आहे.
शिवभक्तांच्या नैतिक जबाबदारीत वाढ
कावड महोत्सवाचे आकर्षण असलेल्या सर्वात मोठ्या,आकर्षक व सामाजिक संदेश देणाऱ्यांमध्ये जुने शहरातील शिवभक्त मंडळांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने डाबकी रोडवासी मित्र मंडळ, जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळ, हरिहर शिवभक्त मंडळ, जय भवानी शिवभक्त मंडळांचा समावेश आहे. कावडमध्ये सहभागी होणाºया शिवभक्तांची संख्या व कोरोनाचे सावट पाहता यंदा शिवभक्त मंडळांच्या नैतिक जबाबदारीत वाढ झाल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.