अकोला महापालिकेच्या सभेत सोडले डुकराचे पिल्लू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 12:24 PM2017-06-28T12:24:46+5:302017-06-28T12:24:46+5:30

महापालिकेची महासभा सकाळी अकरा वाजता सुरू झाल्यानंतर सभेत विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीही गोंधळ घालण्यास सुरवात केली

Akola corporation council pigs left! | अकोला महापालिकेच्या सभेत सोडले डुकराचे पिल्लू !

अकोला महापालिकेच्या सभेत सोडले डुकराचे पिल्लू !

Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 28 -  महापालिकेची महासभा सकाळी अकरा वाजता सुरू झाल्यानंतर सभेत विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीही गोंधळ घालण्यास सुरवात केली.  साफसफाईअभावी प्रभागात घाण व अस्वच्छता पसरली असून, बंद पथदिव्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.
 
मोर्णा नदीपात्रातील जलकुंभीमुळे डासांची पैदास वाढल्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. होय, यासर्व समस्या आहेत, खुद्द सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अजय शर्मा यांच्या प्रभाग १२ मधील. समस्या निकाली निघत नसतील, तर आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा देत अजय शर्मा यांनी सत्ताधाºयांना घरचा अहेर दिला होता त्यांनी महासभेत चक्क डूकाराचे पिल्लू सोडून गोंधळ उडवला.
 
तर दूसरीकडे करवाढीच्या विरोधात विरोधी सदस्य आक्रमक झाले आहेत. या गोधळात माईकची तोडफोड झाल्याने ज्या नगरसेवकांनी माईक तोडला त्याची भरपाई मानधनातून करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले.  दरम्यान दुपारीप्रशासनाने केलेल्या करवाढीच्या विरोधात भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा धडकणार असल्याने महापालिका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
 

Web Title: Akola corporation council pigs left!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.