अकोला : साईबाबांच्या पादुका दर्शनासाठी भक्तांची गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:50 AM2018-02-06T01:50:54+5:302018-02-06T01:51:06+5:30
अकोला : साईबाबा जन्मशताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमन झाले असता, पादुकांच्या दर्शनासाठी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात अकोलेकरांची गर्दी उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : साईबाबा जन्मशताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमन झाले असता, पादुकांच्या दर्शनासाठी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात अकोलेकरांची गर्दी उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले.
साईबाबांच्या जन्म शताब्दीनिमित्त शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांचे सोमवारी राजराजेश्वर नगरीत साईबाबांच्या पादुका घेऊन आगमन झाले. समितीचे सर्व सेवाधिकारी आ. गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते पादुकांचे पूजन होऊन शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरापासून सकाळी १0 वाजता शोभायात्रा निघाली. यावेळी ठिकठिकाणी पादुकांवर पुष्पवृष्टीचा वर्षाव करून अकोलेकरांनी दर्शन घेतले. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दिव्यांग, अंध व मूकबधिर विद्यार्थी, मातृशक्तीसाठी दर्शनाची वेगळी रांग लावण्यात आली होती.
यावेळी आ. गोपीकिशन बाजोरिया, सुहासिनीताई धोत्रे, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, समितीचे अध्यक्ष हरीश मानधने, डॉ.आर.बी. हेडा, हरीश आलिमचंदानी, ब्रिजमोहन चितलांगे, कैलास मामा अग्रवाल, समितीचे सचिव जगदीश मुंदडा, पुरुषोत्तम मालपाणी, सुमनताई गावंडे, सतीश ढगे, उषा विरक यांनी पूजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश मिश्रा, डॉ. रणजित सपकाळ, ओमप्रकाश बाजोरिया, विजय तोष्णीवाल, सुजित सिंग ठाकूर, सत्यनारायण जोशी, दिलीप खत्री, गिरीश जोशी, आशिष बाहेती, प्रदीप शर्मा, विजय जयपिल्ले, अमोल ढोरे, गोपाल खंडेलवाल, वसंत बाछुका, अशोक गुप्ता, नाना उजवणे, ओमप्रकाश गोयंका, श्यामसुंदर खंडेलवाल, राधेश्याम भन्साळी, तरुण खत्री, अशोक धानुका, रमेश कोठारी, डॉ. विनोद बोर्डे, अशोक शर्मा, डॉ. अभय जैन, राजेश सरप, विजय शर्मा, शैलेश गोसावी, पवन बाहेती, संजय अग्रवाल यांच्यासह असंख्य भाविकांनी परिश्रम घेतले.
शिर्डी येथील विश्वस्तांचा सत्कार
साईबाबा यांच्या पादुका आणणारे शिर्डी येथील विश्वस्त व मान्यवरांचा आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी यथोचित सत्कार केला. अक ोलेकरांना पादुकांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विश्वस्तांचे आभार व्यक्त करण्यात आले.
वयोवृद्ध महिलांची आरोग्य तपासणी
वृद्धाश्रमातील वयोवृद्ध महिलांसाठी यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण चव्हाण व त्यांच्या चमूने मोफत आरोग्य तपासणीची व्यवस्था केली होती. यावेळी अंध विद्यालयातील विद्यार्थी शंकर बेले याने साई बाबांचे भजन गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
अंध मुलांना महाप्रसादाचे वाटप
मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात पादुकांच्या दर्शनासाठी आलेल्या अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध स्त्रियांना दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली होती. दर्शन घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.