Akola: निर्दयतेने बांधलेल्या गुरांनी घेतला माेकळा श्वास, पाेलिसांनी केली सुटका, अकाेल्यातील साेळाशे प्लाॅटमधील घटना 

By राजेश शेगोकार | Published: April 13, 2023 06:06 PM2023-04-13T18:06:15+5:302023-04-13T18:06:44+5:30

Akola News: अकाेला शहरातील  सोळाशे प्लॉटच्या कॉम्प्लेक्सच्या आवारातील एका घराच्या पाठीमागे असलेल्या जागेवर ६ गुरांना निर्दयतेने बांधून ठेवले असल्याची माहिती मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व अकोट फैल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या गुरांची सुटका केली.

Akola: Cruelly tied cattle breathed their last, rescued by police, incident in Solashe plots in Akola | Akola: निर्दयतेने बांधलेल्या गुरांनी घेतला माेकळा श्वास, पाेलिसांनी केली सुटका, अकाेल्यातील साेळाशे प्लाॅटमधील घटना 

Akola: निर्दयतेने बांधलेल्या गुरांनी घेतला माेकळा श्वास, पाेलिसांनी केली सुटका, अकाेल्यातील साेळाशे प्लाॅटमधील घटना 

googlenewsNext

- राजेश शेगाेकार
अकोला : अकाेला शहरातील  सोळाशे प्लॉटच्या कॉम्प्लेक्सच्या आवारातील एका घराच्या पाठीमागे असलेल्या जागेवर ६ गुरांना निर्दयतेने बांधून ठेवले असल्याची माहिती मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व अकोट फैल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या गुरांची सुटका केली. या प्रकरणात संशयीत आराेपी हा फरार झाला असून पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत.

अकाेला शहरातील अकाेट फैल परिसरात असलेल्या  सोळाशे प्लॉट येथे कत्तलीसाठी ६ गुरांना निर्दयतेने बांधून ठेवल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सूरज गुंजाळ, विपुल पाटील व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा मारून ६ गुरांना माेकळे केले या दरम्यान  आरोपी अब्दुल सलीम उर्फ बल्ली अब्दुल रहमान हा घरामागील घटनास्थळावरून पसार झाला, या गुरांची किंमत ८५ हजार रुपये आहे. कारवाईनंतर पाेलीसांनी गुरे संगोपनासाठी आदर्श गोरक्षण संस्था म्हैसपूर येथे पाठविण्यात आली आहेत.

Web Title: Akola: Cruelly tied cattle breathed their last, rescued by police, incident in Solashe plots in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला