अकोला-दर्यापूर रस्त्याची लागली वाट
By admin | Published: May 27, 2014 06:33 PM2014-05-27T18:33:31+5:302014-05-27T18:42:05+5:30
अकोला ते घुसरदरम्यान नऊ किलोमीटरचा रस्ता खराब झालेला असताना बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
घुसर : अकोला ते घुसरदरम्यान नऊ किलोमीटरचा रस्ता खराब झालेला असताना बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. या मार्गाची अवस्था बघता अपघाताची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व या विभागाचे अभियंता यांच्या तालमेळ नसल्याने या रस्त्याची वाट लागली आहे. अकोला ते दर्यापूर मार्गावरील वाहने या रस्त्याने जात असून, वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्यावर अधिकार्यांना दिसत का नाहीत? आचारसंहिता लागण्याचे अधिकारी वाट पाहत असल्याचा आरोप होत आहे. या विभागाच्या अधिकार्यांचे राजकीय लोकांसोबत लागेबांधे असल्यामुळे लोकप्रतिनिधीसुद्धा आवाज उठवायला तयार नाहीत. एका महिन्यात या मार्गावर चार अपघात झाले. यामध्ये दोघांचे पाय निकामी झालेत. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर ही वेळ आली; मात्र बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना याचे काहीच देणे-घेणे नाही असे दिसते.