अकोला : मोर्णा नदीची पूरसंरक्ष भिंत तोडणा-यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:31 AM2017-12-13T10:31:21+5:302017-12-13T11:55:02+5:30
अकोला : जुने शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक १0 मधील अम्माजान मशीदजवळील मोर्णा नदीची पूरसंरक्ष भिंत तोडून त्या दिशेने प्रवेशद्वार केले जात आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील जागरूक महिलांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुने शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक १0 मधील अम्माजान मशीदजवळील मोर्णा नदीची पूरसंरक्ष भिंत तोडून त्या दिशेने प्रवेशद्वार केले जात आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील जागरूक महिलांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन महापालिका, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरसेविका, पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
जुने शहरातील मोर्णा नदीपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून भिंत बांधण्यात आली होती; मात्र परिसरातील काही लोकांनी ही भिंत तोडून त्याचा वापर सुरू केला. भविष्यात यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिकेला कळविले असता, त्यास नोटीस बजावली गेली होती; मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. महापालिका प्रशासन, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुने शहर ठाणेदार आणि परिसरातील शिवसेना नगरसेविका मंजूषा शेळके यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील महिलांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.