राज्यातील अकाेला, धुळे पाेलीस प्रशिक्षण केंद्र ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:08 AM2021-07-10T10:08:04+5:302021-07-10T10:08:10+5:30
Akola Police Training Center : अकाेला आणि धुळे पाेलीस प्रशिक्षण केंद्र ५०० ते ६०० पूर्व प्रविष्ट पाेलीस कर्मचारी नसल्याने ओस पडले आहे.
- सचिन राऊत
अकाेला : काेराेनाचे भीषण संकट मार्च २०२० मध्ये आल्यानंतर कडक लाॅकडाऊन लावण्यात आले हाेते. त्यामुळे पाेलीस भरती न झाल्याने राज्यातील अकाेला आणि धुळे पाेलीस प्रशिक्षण केंद्र ५०० ते ६०० पूर्व प्रविष्ट पाेलीस कर्मचारी नसल्याने ओस पडले आहे. २०२० आणि २०२१ या दाेन वर्षांत येथे प्रशिक्षणार्थी पाेलीस नसल्याने नेहमी पाेलिसांच्या परेडने गजबजलेले येथील मैदान सध्या रिकामेच असल्याचे वास्तव आहे. अकाेला पाेलीस प्रशिक्षण केंद्र हे इंग्रजकालीन असून, या ठिकाणी दरवर्षी तब्बल ५०० ते ६०० पूर्व प्रविष्ट पाेलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, काेराेनाच्या संकटकाळात लाॅकडाऊन असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाेलीस भरतीच झाली नाही. पर्यायाने राज्यातील काही पाेलीस प्रशिक्षण केंद्रे रिकामीच आहेत. मात्र, अकाेला पाेलीस प्रशिक्षण केंद्रात पाेलीस नसतानाही ५० पाेलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती आहे. अकाेला पाेलीस प्रशिक्षण केंद्रात आतापर्यंत हजाराे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, देशभरात ज्या संकटाने हैदाेस घातला, त्यामुळे देशातील अन्य बहुतांश संस्थांवर जे परिणाम झाले तेच परिणाम अकाेला व धुळे येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रामध्येही झाल्याचे वास्तव आहे.
५० प्रमाेटी पीएसआयना ट्रेनिंग
अकाेला पाेलीस प्रशिक्षण केंद्रात पूर्व प्रविष्ट पाेलीस नसल्याने या ठिकाणी ५० प्रमाेटी पीएसआय पाेलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासह धुळे पाेलीस प्रशिक्षण केंद्रातही हीच स्थिती असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
राज्यातील पाेलीस प्रशिक्षण केंद्रे
राज्यातील विदर्भात नागपूर व अकाेला येथे पाेलीस प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वित आहेत, तर पांढरकवडा येथे पाेलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले आहे. या व्यतिरिक्त मुंबइतील मराेळ, पुण्यातील खंडाळा, धुळे, जालना, साेलापूर या जिल्ह्यांत पाेलीस प्रशिक्षण केंद्रे आहेत. यामधील केवळ अकाेला व धुळे या दाेन ठिकाणीच सध्या प्रशिक्षण सुरू नसून लवकरच प्रशिक्षण सुरू हाेणार असल्याची माहिती आहे.
प्रशिक्षणार्थी पाेलीस नसले तरी पदाेन्नतीने आलेल्या पाेलीस उपनिरीक्षकांना या ठिकाणी गत अनेक दिवसांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासह विविध ऑनलाइन लेक्चर घेण्यात येत असून, वेगवेगळे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. अकाेला प्रशिक्षण केंद्रात लवकरच आता पाेलिसांनाही प्रशिक्षण सुरू हाेणार आहे.
अशाेक थाेरात
प्राचार्य पाेलीस प्रशिक्षण केंद्र अकाेला
रविवारी शहरात खरेदी
पाेलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पाेलीस दर रविवारी शहरातील बाजारपेठेत गर्दी करीत असल्याचे दिसून येत हाेते. मात्र, गत एका वर्षापासून ते शहरातही दिसत नसल्याचे चित्र आहे. पांढरा शर्ट व पांढरीच पँट परिधान करून प्रशिक्षणार्थी पाेलिसांची झुंबडच शहरात दर रविवारी दिसत हाेती. मात्र, आता ती गर्दी दिसत नाही.