अकोला जिल्हय़ात ६२३९ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: July 21, 2015 01:13 AM2015-07-21T01:13:37+5:302015-07-21T01:13:37+5:30
ग्रामपंचायत निवडणुका; शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड
अकोला: जिल्हय़ातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवारी) जिल्हय़ात ६२३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड झाली होती. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्या जिल्हय़ातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ह्यऑनलाईनह्ण उमेदवारी अर्ज भरून, त्याची प्रत (प्रिंट) संबंधित तहसील तथा निवडणूक अधिकार्यांकडे दाखल करण्याची प्रक्रिया गत आठवड्यात १३ जुलैपासून सुरू झाली. सोमवार, २0 जुलै रोजी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने, सोमवारी ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्या इच्छुक उमेदवारांची ह्यऑनलाईनह्ण अर्ज भरण्यासाठी जिल्हय़ातील सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष व इंटरनेट सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तसेच ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत (प्रिंट) तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्यांकडे सादर करण्यासाठी जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवारपर्यंत) जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात एकूण ६२३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले.