अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवर जाऊन केलं सातबाराचं वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 01:21 PM2017-08-01T13:21:05+5:302017-08-01T13:24:40+5:30

जिल्ह्यात शेतकऱ्यांना सात-बारा सहज व सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचं संगणकीकरण करण्यात आलं आहे.

Akola district collector has gone on a bicycle for seven years | अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवर जाऊन केलं सातबाराचं वाटप

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवर जाऊन केलं सातबाराचं वाटप

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात शेतकऱ्यांना सात-बारा सहज व सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतकऱ्यांच्या वेशात चांदूर गावात सायकलने जाऊन शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा वितरण केलं.  संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.

अकोला, दि. 1- जिल्ह्यात शेतकऱ्यांना सात-बारा सहज व सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. मंगळवारी (1 ऑगस्ट रोजी) महसूल दिनानिमित्त स्वत: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतकऱ्यांच्या वेशात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने जाऊन शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा वितरण केलं. 
सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सात-बाराचं संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. अकोला जिल्ह्यात हे काम पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.
मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. यावेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचं शेतकऱ्यांना वितरण केल. या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणं व त्यांचं मनोधैर्य वाढविणं, हा देखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Web Title: Akola district collector has gone on a bicycle for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.