जिल्हाधिकाऱ्यांना झोंबले मोर्णा महोत्सवाचे अपयश;पत्रकारांना बंगल्यावर बोलावून केला अपमान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:17 PM2019-01-01T12:17:33+5:302019-01-01T12:21:30+5:30

अकोला: शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवास भरभरून प्रसिद्धी न दिल्याने पित्त खवळलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी वर्तमानपत्रांचे संपादक व पत्रकारांना चहापाण्यासाठी बंगल्यावर बोलावून रोष व्यक्त केला.

Akola District Collector humiliate journalists | जिल्हाधिकाऱ्यांना झोंबले मोर्णा महोत्सवाचे अपयश;पत्रकारांना बंगल्यावर बोलावून केला अपमान 

जिल्हाधिकाऱ्यांना झोंबले मोर्णा महोत्सवाचे अपयश;पत्रकारांना बंगल्यावर बोलावून केला अपमान 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दूपारी अकोला शहरातील सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकांना चहापाण्यासाठी आमंत्रीत केले. प्रथम दूषित पाणी असलेले प्याले बोलावले. ते पत्रकारांच्या हाती दिले व जादू बघा, असे म्हणाले. तुमच्या नोकऱ्यांशी इमान बाळगा, त्या कधीही जाऊ शकतील, अशी भाषा वापरण्यास सुरवात केली.


अकोला : शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवास भरभरून प्रसिद्धी न दिल्याने पित्त खवळलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी वर्तमानपत्रांचे संपादक व पत्रकारांना चहापाण्यासाठी बंगल्यावर बोलावून रोष व्यक्त केला. त्यासाठी संपादक व पत्रकारांच्या हाती चक्क दूषित पाणी भरलेले प्याले देण्याचा, तसेच धूर करून पत्रकारांचे स्वागत करण्याचा बालीशपणाही त्यांनी केला.
जिल्हाधिका?्यांनी सुरू केलेल्या मोर्णा स्वच्छता अभियानास वर्तमानपत्रांनी भरभरून प्रसिद्धी दिल्यामुळे थेट पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर मोर्णा महोत्सवाच्या नावाखाली नुकतेच अकोल्यात तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमांना प्रसारमाध्यमांनी यथोचित प्रसिद्धी दिली; मात्र जिल्हाधिका?्यांच्या मते ती पुरेशी नव्हती. त्यामुळे पित्त खवळलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी
सोमवारी दूपारी अकोला शहरातील सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकांना चहापाण्यासाठी आमंत्रीत केले. जे संपादक शहरात नव्हते त्यांनी किमान प्रतिनिधी तरी पाठवावा असा आग्रह धरण्यात आला. त्यानुसार काही वर्तमानपत्रांचे संपादक आणि काही वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी जिल्हाधिका?्याच्या निवासस्थानी पोहोचले. गजानन नारे, मधु जाधव व अशोक ढेरे ही मोर्णा महोत्सवाची आयोजक त्रयी, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यासह इतरही काही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती.
जिल्हाधिकाºयांनी सर्वात प्रथम दूषित पाणी असलेले प्याले बोलावले. ते पत्रकारांच्या हाती दिले व जादू बघा, असे म्हणाले. जिल्हाधिकाºयांचा आता हा कोणता नवा प्रयोग म्हणून सारेच उत्सुकतेने पाहत होते. तेवढयात त्यांनी एका कर्मचा?्याला, जादू घेऊन ये, असे सांगीतले. त्या व्यक्तिने एका टोपल्यामध्ये अर्धवट जळलेल्या अवस्थेत काडी कचरा आणला व पत्रकारांच्या समोर ठेवला. त्या धूरामुळे , हातातील प्याल्यातील दूषित पाण्यावर कोणता परिणाम होणार, याची उत्सुकता पत्रकारांना लागली होती; मात्र जिल्हाधिकाºयांनी दूषित पाण्याचे पेले व धुराचे टोपले घेऊन जाण्याचे फर्मान सोडले. तोपर्यंतही नेमके काय घडत आहे, ते पत्रकारांना कळले नाही. पत्रकारांनी विचारणा केली असता, थोडा धीर धरा असे म्हणत, सर्वांची उत्सुकता ताणुन धरली. त्यानंतर जिल्हाधिका?्यांनी संबोधनाला सुरवात केली. नव्या वर्षात नवे काय केले पाहिजे यावर आपण चर्चा करू, असे म्हणत त्यांनी सर्वच वर्तमानपत्रांचे गेल्या चार दिवसातील अंक बोलावले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या मनातील खरी मळमळ बाहेर पडली.
मोर्णा महोत्सवाला एवढीच प्रसिद्धी का दिली, असा जाब विचारणे त्यांनी सुरू केले. एवढयावर ते थांबतील किंवा मोर्णा उत्सवाचा कंपू त्यांना थांबवेल, अशी अपेक्षा असलेल्या पत्रकारांनी सयंमाने आधी ऐकून घेण्याची भूमिका ठेवली; मात्र यशाची हवा डोक्यात गेलेल्या जिल्हाधिका?्यांनी, तुमच्या नोकºयांशी इमान बाळगा, त्या कधीही जाऊ शकतील, अशी भाषा वापरण्यास सुरवात केली. त्यानंतर मात्र सर्वच पत्रकारांचा संयम संपला आणि त्यांनी जिल्हाधिकाºयांना प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली.
कोणत्याही मजकुराच्या प्रसिद्धीसंदभार्तील अंतिम निर्णय संपादकांचा आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे त्यांना उपस्थित पत्रकारांनी ठणकावून सांगितले.
सर्व पत्रकारांनी एका सुरात जिल्हाधिकाºयांना धारेवर धरल्यानंतर मात्र, आपला अपमान करण्याचा उद्देश नसल्याचे सांगत त्यांनी क्षमायाचना सुरू केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार गजानन नारे, मधु जाधव, अशोक ढेरे व संजय खडसे हे मुक दर्शक बनुन पाहत होते. त्यानंतर सर्व पत्रकारांनी निषेध करीत बहिर्गमन केले.


जिल्हाधिकाऱ्यांनी फेकले वर्तमानपत्राचे अंक
मोर्णा महोत्सवाला एका स्थानिक वर्तमानपत्राने अजिबात प्रसिद्धी दिली नाही, जणू काही बहिष्कार घातला होता, त्या वर्तमानपत्राचे चारही दिवसाचे अंक ही तर रद्दी आहे, अशी उद्दाम भाषा वापरत जिल्हाधिका?्यांनी त्या वर्तमानपत्राचे अंक चक्क फेकून दिले.


प्रशासनाचा सहभाग नव्हता तर वकीलपत्र घेतले कशाला?
मोर्णा महोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासकीय अधिकाºयांनी आपले वजन वापरून सहयोग राशी गोळा करण्यास सहकार्य केले. ही बाब संपूर्ण अकोला शहरात चचेर्ची होती. प्रत्यक्षात मात्र महोत्सव लोक सहभागातून साजरा झाल्याचे नाटक वठविण्यात आले. जर मोर्णा महोत्सव हा प्रशासनाचा उपक्रम नव्हता तो मोर्णा फाऊंडेशनचा उपक्रम होता, तर मग उत्सवाला अपेक्षित प्रसिद्धी न मिळाल्याबद्दल आयोजकांचे वकीलपत्र घेऊन जिल्हाधिकाºयांनी संपादक व पत्रकारांशी असा उद्दामपणा केला तरी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Akola District Collector humiliate journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.