अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत साफ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:26 PM2018-09-04T13:26:15+5:302018-09-04T13:26:39+5:30

अकोला: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेत, कार्यालयातील पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत चक्क जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी साफ केली.

 Akola district collector made clear the wall painted by the pitch | अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत साफ 

अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत साफ 

Next

- संतोष येलकर

अकोला: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेत, कार्यालयातील पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत चक्क जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी साफ केली.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, मंडळ अधिकारी भगवान थिटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील विविध विभागांची पाहणी करीत, कामकाजाची माहिती घेतली. पाहणी दरम्यान, कार्यकारी अभियंता कार्यालयाला लागूनच असलेली भिंत पानाच्या पिचकाºयांनी रंगलेली दिसताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तिथे थांबले. कार्यालयातील कर्मचाऱ्याला बादली, पाणी व कापड घेऊन बोलावले आणि बादलीतील पाणी व कापडाने, स्वत: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पानाच्या पिचकाºया व थुंकींनी रंगलेली भिंत स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. कार्यालयातील भिंत स्वत: जिल्हाधिकारी साफ करीत असल्याचे बघताच, कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तेथे जमले व आश्चर्यचकित झाले.

‘साहेब, राहू द्या आम्ही करतो भिंत साफ’!
कार्यालयातील भिंत जिल्हाधिकारी साफ करीत असल्याचे बघताच, तेथे उपस्थित कार्यकारी अभियंता कार्यालयातील एका महिलेने ‘साहेब राहू द्या, आम्ही भिंत साफ करतो’ असे म्हणत भिंत साफ करण्याचे काम थांबविण्याची विनंती जिल्हाधिकाºयांना केली. संबंधित महिला कर्मचाºयाच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी भिंत साफ करण्याचे काम थांबविले.

कार्यकारी अभियंत्यांना कानपिचक्या;

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांना कानपिचक्या देत, दोन दिवसात कार्यालयातील साफसफाई करण्याचे निर्देश दिले.

जलसंपदा विभागात
हाताने काढले जाळे!
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लागूनच असलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयालाही भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये एका कक्षाच्या प्रवेशद्वारावर असलेले जाळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वत:च्या हाताने काढून, कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या सूचना संबंधित कर्मचाºयांना दिल्या.
 

 

Web Title:  Akola district collector made clear the wall painted by the pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.