अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘शुन्य सावली’ दिवसाचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 04:00 PM2018-05-24T16:00:23+5:302018-05-24T16:00:23+5:30
सावलीचा रोमांचकारी अनुभव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अनुभवला.
अकोला: जेव्हा सुर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणूकाही ती गायब झाली असा भास होतो. हा सावलीचा रोमांचकारी अनुभव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अनुभवला. यावेळी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ , निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, प्रभात किड्सचे विदयार्थी व शिक्षक उपस्थित होते.
पृथ्वी सुर्याभोवती भ्रमण करताना पृथ्वी आपल्या कक्षात साडेतेवीस अंश सुर्याकडे झुकते.यामुळे सुर्योदय आणि सुर्यास्त प्रत्येक दिवशी स्थान बदलवून होत असतो. यामुळे उत्तरायन व दक्षिनायन होत असते. प्रत्येक वर्षी दोन दिवस सुर्य विषुववृत्तावर असल्यामुळे रात्र व दिवस समान असतात. पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागात सुर्य कधी डोक्यावर येत नाही. तो सदैव दक्षिण किंवा उत्तरेकडे असतो. परंतू या दोन टोकाच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वषार्तून दोनदा सुर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सुर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणूकाही ती गायब झाली असा भास होतो. हा सावलीचा रोमांचकारी अनुभव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह अकोलेकरांनी अनुभवला.
आपली सावली आपली सोबत सोडून गेली आहे असे कधीच होत नाही. परंतू ती वषार्तून दोन वेळा हरवू शकते. सुर्य अगदी आपल्या डोक्याच्या तंतोतंत वर असतो आणि त्यामुळे आपली किंवा कोणत्याही वस्तूची सावली ही अगदी बरोबरआपल्या पायाखाली किंवा कोणत्याही वस्तूची सावली त्या वस्तूखाली लपते त्यामुळे ती दिसत नाही. म्हणजेच शुन्य सावली दिवस (झिरो शॅडो डे) होय.