अकोला जिल्हा परिषद भरती प्रक्रिया; पद १, अर्ज १२६!
By admin | Published: November 7, 2014 12:52 AM2014-11-07T00:52:15+5:302014-11-07T00:52:15+5:30
औषध निर्माण अधिकारी पदासाठी तब्बल १२६ उमेदवारांचे अर्ज जिल्हा परिषदकडे प्राप्त.
अकोला : जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचार्यांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामध्ये आरोग्य विभागांतर्गत एक औषध निर्माण अधिकारी पदासाठी तब्बल १२६ उमेदवारांचे अर्ज जिल्हा परिषदकडे प्राप्त झाले. जिल्हा परिषदेतील विविध भागात रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत दोन कनिष्ठ अभियंता पदांसाठी गेल्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर दुसर्या ट प्प्यात आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या रिक्त पदांसाठी शनिवारी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी या एका पदासाठी तब्बल १२६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले, तर आरोग्यसेवक (महिला) २0 पदांसाठी ५९0 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, ग्रामसेवकांच्या ११ पदांसाठी १ हजार ५७ अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले.