अकोला जिल्हय़ात दहा कोटींच्यावर पिकांचे नुकसान!

By admin | Published: March 27, 2015 01:31 AM2015-03-27T01:31:34+5:302015-03-27T01:31:34+5:30

गहू, हरभ-यांचे सर्वाधिक नुकसान, मूर्तिजापूर तालुक्याला मोठा फटका.

Akola district damages crops over ten crore! | अकोला जिल्हय़ात दहा कोटींच्यावर पिकांचे नुकसान!

अकोला जिल्हय़ात दहा कोटींच्यावर पिकांचे नुकसान!

Next

अकोला : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्हय़ातील गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, नुकसानीचा हा आकडा दहा कोटींच्यावर असल्याचे वृत्त आहे. २८ ते १ मार्चपर्यंत गारपीट आणि वादळी वार्‍यांसह आलेल्या पावसाने वर्‍हाडातील पाचही जिल्हातील पिकांना जबर फटका बसला आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे. रब्बी पिकांवर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना या पावसाने पीक ऐन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अकोला जिल्हय़ातील ३ हजार ६0३ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. या जिल्हय़ात सर्वाधिक फटाक मूर्तिजापूर तालुक्याला बसला असून, या तालुक्यातील २,५00 हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आता मदतीची प्रतिक्षा असून आगामी हंगामी साठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा शेतकर्‍याची आहे.

Web Title: Akola district damages crops over ten crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.