अकोला जिल्ह्यात ८८ हजार शेतकर्यांना कर्जमाफी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:22 AM2017-12-19T00:22:36+5:302017-12-19T00:23:48+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी १८ डिसेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकाबाकीदार ८८ हजार ८१८ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. संबंधित शेतकर्यांच्या कर्जखात्यात ३८८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी १८ डिसेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकाबाकीदार ८८ हजार ८१८ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. संबंधित शेतकर्यांच्या कर्जखात्यात ३८८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आले.
शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जमाफीस पात्र शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बँकांना प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत १५ दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र एकूण शेतकर्यांपैकी १८ डिसेंबरपर्यंत जिल्हय़ात ८८ हजार ८१८ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. संबंधित शेतकर्यांच्या कर्जखात्यात ३८८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून, शेतकर्यांचे कर्जखाते ‘नील’ करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्यांचा समावेश आहे.
एक लाखावर शेतकर्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच!
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये कर्जमाफीस पात्र १ लाख ९१ हजार १८७ शेतकर्यांपैकी जिल्ह्यात ८८ हजार ८१८ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला, तरी उर्वरित १ लाख २ हजार ३६९ शेतकर्यांना अद्याप कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षाच आहे.
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी ८८ हजार ८१८ शेतकर्यांच्या कर्जखात्यात ३८८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करून, कर्जखाते ‘नील’ करण्यात आले. जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)