अकोला जिल्हय़ातील बँकांमध्ये जमा होणार दोन हजार कोटी!
By admin | Published: November 16, 2016 02:20 AM2016-11-16T02:20:43+5:302016-11-16T02:20:43+5:30
कर सल्लागार व ‘सीए’नी दिली माहिती
सचिन राऊत
अकोला, दि. १५- केंद्र शासनाने एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर जिल्हय़ातील बँकांमध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा होणार असल्याची माहिती आहे. कर सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी हा अंदाज व्यक्त केला असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर जिल्हय़ातील बँकांमध्ये पैसे भरणार्यांची मोठी गर्दी आहे; मात्र ही गर्दी करदात्यांची आहे. करदात्यांनी त्यांची रक्कम बँकेत भरण्यासाठी गर्दी केली आहे. यासोबतच शेतकरी आणि महिलांनीही त्यांच्याकडील रद्द नोट बँकेत जमा केल्या आहेत. लाखोंची आणि कोट्टय़वधी रुपयांची कमाई असलेले आणि कर चुकविणारे अद्यापही पैसे गुंतविण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. विविध फंडे वापरून पैसा ह्यव्हाईटह्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे; मात्र अद्याप त्यांनी एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा बाहेरच काढल्या नाहीत. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांनी कर सल्लागारांच्या कार्यालयाच्या फेर्या मारणे सुरू केले आहे. यामधील बहुतांश पैसा हा एक नंबरमध्ये करून तो पैसा बँकेत लवकरच जमा होणार असल्याचा अंदाज कर सल्लागारांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर जिल्हय़ातील बँकांमध्ये हा आकडा तब्बल दोन हजार कोटींच्या आसपास जमा होणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
रोजगार वाढेल..!
शासनाच्या तिजोरीत प्रचंड पैसा आल्यानंतर विकासकामांच्या माध्यमातून तो पैसा बाहेर काढण्यात येईल. प्रत्येक गावखेड्यात मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. कामे वाढणार असल्याने रोजगारही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. रोजगार वाढताच बाजारपेठेत पैसा खेळता राहील आणि याचे सकारात्मक परिणाम भारताचा विकास दर वाढीवर होतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहेत्र.
करदात्यांची संख्या वाढेल!
बँकांमध्ये मोठय़ा प्रमाणात पैसा जमा होणार असल्याने कर्ज सहज उपलब्ध होईल. कर्जाचे व्याजदर घटेल. यासोबतच गृह कर्ज सहज उपलब्ध होणार असल्याने घर, प्लॉट व फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढतील. हे व्यवहार वाढल्यानंतर नागरिक कर भरून व्यवहार करण्याला आता पसंती देतील. त्यामुळे आपोआपच करदात्यांची संख्या वाढणार आहे.
असा येईल शासनाकडे पैसा!
काळा पैसा, कर चुकविण्यासाठी गोळा केलेला बहुतांश पैसा बँकेत येईल. ती रक्कम आपोआपच शासनाकडे जमा होईल. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत मोठी भर पडेल. शासन या रकमेचा विकासकामांसाठी खर्च होईल. याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
कर चुकविणारे बँकेत पैसा जमा करावा किंवा नाही यासंदर्भात विचारणा करीत आहेत; मात्र हे प्रकरण अंगलट येणार असल्याची भीती त्यांना आहे. काळा पैसा फेकल्या जाणार, हे निश्चित आहे. तरीही बराच पैसा अन्य खात्यात येणार असल्याने जिल्हय़ातील बँकांमध्ये दोन हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम जमा होण्याचा अंदाज आहे.
अँड. आशिष बाहेती
कर सल्लागार, अकोला.