अकोला जिल्हा : दोन विद्यार्थ्यांसह चौघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:38 AM2018-03-06T02:38:05+5:302018-03-06T02:38:05+5:30
अकोला : पदवीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी, ५० वर्षीय महिलेने गळफास घेतला. तर एका तरुणाने रेल्वेखाली झोकून देत मूर्तिजापूर शहरात विविध ठिकाणी आत्महत्या केल्या. सीएची तयारी करणाºया युवकाने गायगाव-अकोला रेल्वेमार्गावर आत्महत्या केली. या घटनांनी मूर्तिजापूरसह अकोला व तेल्हारा शहरात सोमवारी शोककळा पसरली. त्यापैकी तिघे तिशीच्या आतीलच असल्याने कुटुंबियांवर आघात झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पदवीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी, ५० वर्षीय महिलेने गळफास घेतला. तर एका तरुणाने रेल्वेखाली झोकून देत मूर्तिजापूर शहरात विविध ठिकाणी आत्महत्या केल्या. सीएची तयारी करणाºया युवकाने गायगाव-अकोला रेल्वेमार्गावर आत्महत्या केली. या घटनांनी मूर्तिजापूरसह अकोला व तेल्हारा शहरात सोमवारी शोककळा पसरली. त्यापैकी तिघे तिशीच्या आतीलच असल्याने कुटुंबियांवर आघात झाला आहे.
जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांसह चौघांनी आत्महत्या केल्याची घटना ५ मार्च रोजी उघडकीस आली. एकाच दिवशी चार आत्महत्या झाल्याने जिल्हा हादरला आहे.
माना येथील नेहा नरेंद्र इंगळे ( १९) ही शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर भाड्याने रुम करून राहत होती. तिने ५ मार्च रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अभ्यासात हुशार असलेली नेहा ही मूर्तिजापुरातील डॉ.आर.जे.राठोड महाविद्यालयात बी.एसस्सीच्या अंतिम वर्षाला शिकत होती. तिच्या आत्महत्येमुळे माना गावात शोककळा पसरली आहे.
दुसºया घटनेत राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील हॉटेल महेकच्या टेरेसवर हैदराबाद येथील रहिवाशी मादीनी जयपाल रेड्डी(५०) यांनी नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसºया घटनेत सचिन रमेश कावनपुरे (३०)याने दर्यापूर मार्गावरील रेल्वे पुलाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. शहरातील दोन्ही आत्महत्याप्रकरणी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
तिसºया घटनेत मूर्तिजापूर रेल्वे पोलिसांनी अकस्मिक मृत्युची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे यांचे मार्गदर्शनाखाली हे.पो.काँ. संतोष धारपवार करीत आहेत.
डाबकी रोड रेल्वे गेटजवळ रोमील राठी नामक एका २५ वर्षीय युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या युवकाची दुचाकी घटनास्थळाजवळच बेवारस पडून होती. डाबकी रोड रेल्वे गेटजवळ तेल्हारा तालुक्यातील वाडी आदमपूर येथील रहिवासी असलेला तसेच अकोल्यात शिक्षणासाठी असलेल्या रोमील राठी नामक २५ वर्षीय युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून पोलिसांनी एमएच ३० एक्यू १८८७ क्रमांकाची दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी मृतक युवकाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.