अकोला जिल्ह्यात १७ हजारांवर अपंगांना योजनांचे कवच!

By Admin | Published: December 3, 2014 01:08 AM2014-12-03T01:08:03+5:302014-12-03T01:08:03+5:30

२0११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ४६ हजार ५३५ अपंग .

Akola district has 17 thousand disabled people's plans! | अकोला जिल्ह्यात १७ हजारांवर अपंगांना योजनांचे कवच!

अकोला जिल्ह्यात १७ हजारांवर अपंगांना योजनांचे कवच!

googlenewsNext

संतोष येलकर/अकोला
अपंगत्वाचे प्रमाणपत्र बाळगणार्‍या जिल्ह्यातील १७ हजार ७२२ अपंग व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत योजनांचे लाभ दिला जात आहे. अपंगत्वावर मात करून, जीवनात काही तरी करण्याची जिद्द असलेल्या अपंगांना योजनांचे कवच महत्त्वपूर्ण ठरत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयामार्फत अपंग व्यक्तींना देण्यात आलेल्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे, अपंग व्यक्तींकरिता शासन आणि जिल्हा परिषद सेस फंडातून विविध योजना राबविण्यात येतात. सन २0११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ४६ हजार ५३५ अपंग बांधव आहेत. त्यामध्ये अंध,अंशत: अंध, मूकबधिर, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, मनोरुग्ण, बहुविकलांग आदी प्रवर्गातील अपंगांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ५३५ अपंग व्यक्तींपैकी ऑगस्ट २0१४ अखेरपर्यंंत अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या १७ हजार ७२२ व्यक्तींना समाजकल्याण विभागामार्फत सद्यस्थितीत शासन निधीतील योजना आणि जिल्हा परिषद सेस फंडातील वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जात आहे. अपंगत्वावर मात करुन,जीवनात काही तरी करुन दाखविण्यासाठी धडपडणार्‍या अपंगांना या योजनांचा लाभ दिला जात आहे.
शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या या विविध योजना अपंगांसाठी मदतीचा आधार ठरत आहेत. तथापि, अपंगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांवर आणखी भर देण्याची गरज असून, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला प्राधान्य देण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Akola district has 17 thousand disabled people's plans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.