अकोला जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर पुन्हा दोन पुरस्कार प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:39 PM2019-01-11T12:39:14+5:302019-01-11T12:39:16+5:30
अकोला : राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) अकोला कार्यालयास ई-प्रशासनातील उत्कृष्टतेकरिता कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) सी.एस.आय. आय.टी. इनोव्हेशन व एक्सलन्स पुरस्कार २०१८ व इलेट्स टेक्नोमेडियाच्या ई- इंडिया या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
अकोला : राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) अकोला कार्यालयास ई-प्रशासनातील उत्कृष्टतेकरिता कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) सी.एस.आय. आय.टी. इनोव्हेशन व एक्सलन्स पुरस्कार २०१८ व इलेट्स टेक्नोमेडियाच्या ई- इंडिया या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
७ डिसेंबर रोजी वेलिंगकर प्रेक्षागृह माटुंगा, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभात कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) संस्थेतर्फे दिल्या गेलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील सी.एस.आय. आय.टी. इनोव्हेशन व एक्सलन्स पुरस्कार २०१८ मधे ई-प्रशासनातील उत्कृष्टतेकरिता अद्ययावत तांत्रिक संकल्पनांचा विद्युत व पाणी या मूलभूत स्रोतांच्या प्रभावी ई-प्रशासन संरचना तयार करण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, अकोलाच्या उपक्रमास निवड होऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१३ डिसेंबर रोजी हॉटेल रॉयल प्लाझा नवी दिल्ली येथे इलेट्स टेक्नोमेडिया या संस्थेतर्फे दिल्या गेलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील १३ व्या ई-इंडिया डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार २०१८ करिता स्मार्ट सर्व्हिस प्रोव्हायडर आॅफ द इयर या श्रेणीत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) अकोल्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची निवड होऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अद्ययावत तांत्रिक संकल्पनांचा विद्युत व पाणी या मूलभूत स्रोतांच्या प्रभावी ई-प्रशासन संरचना तयार करण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अकोलाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमात जिल्हा कार्यालय महसूल विभागातील डीबीए प्रसाद रानडे यांचे योगदान लाभले.