शिष्यवृत्ती वाटपात विभागात अकोला जिल्हा अग्रेसर
By Admin | Published: March 2, 2016 02:34 AM2016-03-02T02:34:33+5:302016-03-02T02:34:33+5:30
पाच जिल्ह्यात ६१ हजारांवर विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती वितरित.
संतोष येलकर/अकोला
समाजकल्याण विभागामार्फत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील २ लाख ४0 हजार ९८३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंपैकी २0 फेब्रुवारीपर्यंंत ६१ हजार ८१७ विद्यार्थ्यांंना शिष्यवृती वितरित करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हानिहाय एकूण लाभार्थी विद्यार्थी आणि त्या तुलनेत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांंची संख्या लक्षात घेता, शिष्यवृत्ती वाटपाच्या कामात विभागात अकोला जिल्हा अग्रेसर आहे.
अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांंना शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. महाविद्यालयांकडून प्राप्त प्रस्तावानुसार संबंधित विद्यार्थ्यांंच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. सन २0१५-१६ या वर्षात विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील एकूण २ लाख ४0 हजार ९८३ विद्यार्थ्यांंची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली. एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांंपैकी २0 फेब्रुवारीपर्यंंत विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ६१ हजार ८१७ विद्यार्थ्यांंंना समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृती वितरित करण्यात आली. जिल्हानिहाय एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांंची संख्या आाणि शिष्यवृत्ती वितरित करण्यात आलेल्या विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत, शिष्यवृत्ती वाटपाच्या कामात अकोला जिल्हा विभागात सर्वांत पुढे असल्याचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हानिहाय शिष्यवृती वाटप करण्यात आलेले विद्यार्थी!
जिल्हा एकूण विद्यार्थी शिष्यवृत्ती दिलेले विद्यार्थी
अकोला ४३२६७ १२0२४
अमरावती ८0२४१ ९0९१
बुलडाणा ४९३0७ १३५९३
वाशिम २0८४५ १0३५६
यवतमाळ ४७३२३ १६७५३
........................................
एकूण २४0९८३ ६१८१७