अकोला जिल्हय़ातील राजकारणात महिला उपेक्षितच..

By admin | Published: September 26, 2014 01:54 AM2014-09-26T01:54:19+5:302014-09-26T01:54:19+5:30

अकोला जिल्ह्यातून विधानसभेत पोहोचल्या केवळ तीन महिला.

In Akola district politics, women are neglected. | अकोला जिल्हय़ातील राजकारणात महिला उपेक्षितच..

अकोला जिल्हय़ातील राजकारणात महिला उपेक्षितच..

Next

नितीन गव्हाळे / अकोला
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५0 टक्के आरक्षणाची घोषणा केली. सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी देण्याविषयी नेहमीच चर्चा होते; परंतु महिलांना समान संधी मात्र कधीच दिली जात नाही. विधानसभा निवडणुकांमध्येसुद्धा महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. आता पर्यंत विधानसभेच्या १२ निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये महिलांच्या पदरी निव्वळ उपेक्षाच आली. जिल्हय़ातील केवळ तीनच महिला विधानसभेमध्ये पोहोचू शकल्या तर एकीला विधान परिषदे तून संधी मिळाली. त्यानंतर मात्र महिलांना कोणत्याही पक्षाने निवडणुकीत संधीच दिली नाही.
१९६२ ते १९८५ या काळातील निवडणुकांमध्ये जिल्हय़ातील महिलांना काँग्रेस, जनता पार्टीने निवडणुकीत उमेदवारीची संधी दिली. त्यात या महिलांनी बाजीसुद्धा मारली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये मात्र महिलांना कोणत्याच पक्षाने उमेदवारीची संधी दिली नाही. १९६२ मध्ये काँग्रेसने मंगळरूपीर मतदारसंघातून शांता रघुनाथ पागे आणि मूर्तिजापूरमधून कुसूमताई वामनराव कोरपे यांना उमेदवारी दिली होती. या दोघीही अनुक्रमे १८0५५ आणि ३0१७७ मते घेऊन आमदार बनल्या. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मूर्तिजापूरमधून प्रतिभादेवी तिडके यांना संधी दिली. त्या २८३७३ मते घेऊन ही निवडणूक एकतर्फी जिंकली. १९७८ च्या निवडणुकीमध्ये मो. अजहर हुसैन यांच्याविरुद्ध जनता पार्टीने प्रमिला श्रीपाल जैन यांना रिंगणात उरविले; परंतु त्यांचा पराभव झाला. १९८0 व १९८५ च्या निवडणुकीत अजहर हुसैन व रामदास गायकवाड यांच्याविरूद्ध भाज पने डॉ. प्रमिला टोपले यांना दोनदा रिंगणात उतरविले; परंतु दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. पुलोद सरकार असताना, त्यांना विधान परिषदेवर घेऊन आरोग्यमंत्री पद सोपविले होते. १९९0 ते २00४ पर्यंतच्या निवडणुकांमध्ये महिलांना संधी नाकारण्यात आली.

Web Title: In Akola district politics, women are neglected.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.