अकोला जिल्ह्यात सरासरी १६.१७ मिमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:27 AM2020-06-17T10:27:43+5:302020-06-17T10:27:52+5:30

गेल्या २४ तासात सरासरी १६.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Akola district receives average rainfall of 16.17 mm! | अकोला जिल्ह्यात सरासरी १६.१७ मिमी पाऊस!

अकोला जिल्ह्यात सरासरी १६.१७ मिमी पाऊस!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात १६ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात सरासरी १६.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील विविध भागात सोमवार, १५ जून रोजी रात्री दमदार पाऊस बरसला. १६ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६.१७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यात ३०.७ मिमी, बार्शीटाकळी तालुक्यात २० मिमी, अकोट तालुक्यात १५ मिमी, तेल्हारा तालुक्यात १५.५ मिमी, बाळापूर तालुक्यात १५.१ मिमी, पातूर तालुक्यात १५.४ मिमी आणि मूर्तिजापूर तालुक्यात १.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासात जिल्ह्यात झालेल्या पावसाची आकडेवारी बघता, सर्वाधिक पाऊस अकोला तालुक्यात ३०.७ मिमी तर सर्वात कमी पाऊस मूर्तिजापूर तालुक्यात १.४ मिमी झाला आहे.

Web Title: Akola district receives average rainfall of 16.17 mm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.