शिंदे गटाकडून अकोला जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 19:45 IST2022-08-03T19:44:53+5:302022-08-03T19:45:38+5:30
शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले, संजय गायकवाडदेखील होते उपस्थित

शिंदे गटाकडून अकोला जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील 'खरी शिवसेना कोणाची' हा वाद सुरू असतानाच आज अकोल्यात शिंदे गटाकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिवसेना नेते आमदार गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रतोद भरत गोगावले, संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यातील खालील नियुक्त्या जाहीर केल्या.
१) अश्विन उद्धवराव नवले - जिल्हाप्रमुख (अकोला पश्चिम, मुर्तीजापुर, अकोट)
२) विठ्ठल सराफ पाटील - जिल्हाप्रमुख (बाळापूर अकोला पूर्व)
३) योगेश रुपचंद अग्रवाल - अकोला महानगर प्रमुख
४) शशिकांत वामनराव चोपडे - उपजिल्हाप्रमुख
५) योगेश राजूभाऊ बुंदिले - निवासी उपजिल्हाप्रमुख
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पक्षाचे ध्येयधोरण घराघरात पोहोचविण्यासाठी व पक्ष वाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.