अकोला जिल्ह्यात सोयाबीचा उतारा सरासरी चार क्विंटलच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:21 PM2018-10-10T16:21:44+5:302018-10-10T16:22:19+5:30

अकोला: पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीही सोयाबीन पिकावर झाला असून, सरासरी एकरी उत्पादन चार क्विंटल आले आहे.

Akola district soyaben extract average four quintals! | अकोला जिल्ह्यात सोयाबीचा उतारा सरासरी चार क्विंटलच!

अकोला जिल्ह्यात सोयाबीचा उतारा सरासरी चार क्विंटलच!

Next

अकोला: पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीही सोयाबीन पिकावर झाला असून, सरासरी एकरी उत्पादन चार क्विंटल आले आहे. बरड तसेच नदीकाठच्या जमिनीत हे उत्पादन एकरी एक ते दीड क्विंटलच असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
जिल्ह्यात यावर्षी शेतकºयांनी सोयाबीला पसंती देत जवळपास १ लाख ९० हजार हेक्टरच्यावर सोयाबीन पेरणी केली. सुरुवातील पाऊस पोषक ठरल्याने सोयाबीन पीक जोमाने वाढले; परंतु पीक फुलोºयावर येण्याच्या अवस्थेत पावसाने दीर्घ खंड दिल्याने बरड, नदीकाठची तसेच जेथे कमी पाऊस झाला तेथे खूूपच कमी उतारा आला. बरड व नदीकाठच्या जमिनीत एक ते दिड क्विंटलच उतारा आला. भारी जमीन होती; पण पाऊस कमी झाला तेथे एकरी ३ ते ४ क्विंटल उतारा आला. तसेच भारी जमीन आहे, पाऊस बºयापैकी झाला, अशा ठिकाणी सोयाबीनचा उतारा एकरी ५ ते ८ क्विंटल आहे. म्हणजेच यावर्षी पीक चांगले असूनही पावसाने वेळेवर दगा दिल्याने सोयाबीन उत्पादनाचा उतारा असमान आहे. शेतकºयांचा खर्चही यात निघणे कठीण आहे.


 पीक फुलोºयावर असताना पावसाचा दीर्घ खंड पडल्याने यावर्षीही सोयाबीनचा उतारा कमी आला आहे. बरड व नदीकाठच्या जमिनीत हा उतारा एकरी एक ते दीड क्विंटल असून, भारी जमीन आहे; पण पाऊस कमी होता तेथे एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन झाले आहे. यामध्ये उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले. शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे.
मनोज तायडे,
संयोजक,
शेतकरी जागर मंच,
अकोला.

 

Web Title: Akola district soyaben extract average four quintals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.