अकोला जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:57 PM2019-03-03T12:57:43+5:302019-03-03T12:57:49+5:30
अकोला: निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात दोन दिवसीय मतदार नोंदणीची विशेष मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहर आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन, मतदार नोंदणीच्या कामाची पाहणी केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पात्र मतदारांना मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी शेवटची संधी म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) मतदार यादीत नाव नोंदविण्यासंदर्भात नमूना क्र.६ चे अर्ज मतदारांकडून स्वीकारण्यात येत आहेत. या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत नवीन मतदार आणि दिव्यांग मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. मतदार नोंदणी विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी (शनिवारी) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहरातील भीमनगर, गवळीपुरा व लक्कडगंज तसेच मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील कुरुम, नागोली व नरताड येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदार नोंदणीच्या कामाची पाहणी केली. रविवार ३ मार्च रोजीही जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.