अकोला जिल्ह्यात दीड महिन्यांपासून थकले तुरीचे चुकारे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:03 AM2018-03-16T02:03:13+5:302018-03-16T02:03:13+5:30
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १४ मार्चपर्यंत ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदीस दीड महिन्यांचा कालावधी उलटून जात असला, तरी जिल्ह्यातील १६ हजार शेतक-यांना तूर खरेदीचे २७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नाही. त्यामुळे तूर विकल्यानंतर हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत तूर उत्पादक शेतक-यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत ५ हजार ४५० रुपये प्रती क्विंटल दराने जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, पिंजर, पातूर, वाडेगाव व पारस इत्यादी सहा केंद्रांवर गत २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १४ मार्चपर्यंत १६ हजार शेतकºयांची ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
तूर खरेदीस दीड महिन्यांचा कालावधी होत आहे; मात्र तूर विकलेल्या शेतकºयांना ५१ हजार क्विंटल तुरीचे चुकारे अद्याप देण्यात आले नाही. तूर विकल्यानंतर तीन दिवसांत चुकारे मिळणे अपेक्षित असताना, दीड महिन्यांपासून तुरीचे चुकारे मिळाले नसल्याने, तूर विकल्यानंतर हक्काचे पैसे मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न नाफेड केंद्रांवर तूर विकलेल्या जिल्ह्यातील १६ हजार तूर उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
‘नाफेड’द्वारे तूर खरेदी आणि
प्रलंबित रकमेवर एक दृष्टिक्षेप
५४५० रुपये
तूर खरेदीचा प्रती क्विंटल दर
५१ हजार क्विंटल
सहा केंद्रांवर खरेदी केलेली तूर
१६ हजार
तूर खरेदी करण्यात आलेले शेतकरी
२७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये
तूर खरेदीचे प्रलंबित चुकारे
‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत १६ हजार शेतकºयांची ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, तूर खरेदीच्या चुकाºयाची रक्कम ३१ मार्चपर्यंत ‘नाफेड’कडून प्राप्त होण्याची शक्यता आहे. रक्कम प्राप्त झाल्यानंतर तूर खरेदीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
- राजेश तराळे
जिल्हा मार्केटिंग अधिकारी