उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’; ६४ गावांना पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:13 PM2018-07-31T15:13:16+5:302018-07-31T15:16:08+5:30

अकोला: बरसलेल्या पावसाने नदी-नाले वाहू लागले असून, खांबोराजवळील उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने, खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना उन्नई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Akola district: Unnai Dam 'Overflow'; Water supply to 64 villages | उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’; ६४ गावांना पाणीपुरवठा!

उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’; ६४ गावांना पाणीपुरवठा!

googlenewsNext
ठळक मुद्दे खांबोराजवळील उन्नई बंधाºयात काठोकाठ जलसाठा उपलब्ध झाला. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.सध्या सात दिवसाआड योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अकोला: बरसलेल्या पावसाने नदी-नाले वाहू लागले असून, खांबोराजवळील उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने, खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना उन्नई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांना गत दहा महिन्यांपासून सुरू असलेला टँकरद्वारे पाणीपुरवठा १६ जुलैपासून बंद करण्यात आला आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, अकोला शहर व खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणाºया महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला होता. त्यामुळे गतवर्षी पावसाळ्यातच खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानुषंगाने गत सप्टेंबरपासून ६४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यावर्षीच्या पावसाळ्यात गत महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात दमदार पाऊस बरसल्याने, नदी-नाले वाहू लागले आहेत. त्यामध्ये खांबोराजवळील उन्नई बंधाºयात काठोकाठ जलसाठा उपलब्ध झाला. उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने, १६ जुलैपासून, या बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बंधाºयातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने, या गावांना गत दहा महिन्यांपासून सुरू असलेला टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. उन्नई बंधाºयातून सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यात सध्या सात दिवसाआड योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

 

Web Title: Akola district: Unnai Dam 'Overflow'; Water supply to 64 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.