अकोला जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम राबविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 02:10 PM2019-05-16T14:10:04+5:302019-05-16T14:10:11+5:30
अकोला: जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम राबविणार येणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांनासुद्धा दिला आहे.
अकोला: जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम राबविणार येणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांनासुद्धा दिला आहे. वृक्षांचे उत्कृष्टपणे संगोपन करणाºया विद्यार्थ्याला गुण देण्यात येणार आहेत.
शासनाच्यावतीने ३३ कोटी वृक्ष लागवड हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्याला ६२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. भारत वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक तथा समाजसेवक ए. एस. नाथम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला २ मे रोजी पत्र दिले होते. त्यांनी ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’, हा उपक्रम राबविण्याची विनंती जिल्हा प्रशासनाकडे केली होती. हा उपक्रम १ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत प्रत्येक शाळेत अकोला पॅटर्न म्हणून राबविण्यात यावा, असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आदेश दिला आहे. या उपक्रमासाठी पंचायत समिती स्तरावर एका नोडल आॅफिसरची नियुक्ती करावी व केलेल्या कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा घ्यावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रमासाठी मार्गदर्शक सूचना
उपक्रमाबाबतचे परिपत्रक शाळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात यावे, या उपक्रमासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, उपक्रमाची माहिती सर्व वर्गशिक्षकांकडे असणे आवश्यक राहील, विद्यार्थ्यांनी या उपक्रमात केवळ शाळेतच वृक्ष लावावे, अशी सक्ती करू नये, विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणीही वृक्ष लावता येईल. विद्यार्थ्याने लावलेल्या वृक्षासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याला प्रेरित करावे, झाड लावण्यासाठी प्रायोजक शोधणे, शासकीय यंत्रणेमार्फत स्वत: अथवा बीजाद्वारे तयार करून विद्यार्थ्याला सूचित करावे, विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षाबाबत दर महिन्याला त्या वृक्षाची स्थिती जाणून घ्यावी, एखादे वृक्ष सुकल्यास त्या वृक्षाऐवजी नवीन वृक्षारोपणासाठी विद्यार्थ्याचे प्रबोधन करावे.
मुख्याध्यापकांना सादर करावा लागणार अहवाल!
‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ या उपक्रमाचा अहवाल संबंधित मुख्याध्यापकाने सादर करावा, असेही जिल्हाधिकाºयांनी आदेशात नमूद केले आहे. या अहवालात शाळेचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, त्याच्या लावलेल्या वृक्षाचे नाव, वर्गशिक्षकाचे नाव आदी माहिती नमूद करावी लागणार आहे. शक्य असल्यास विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या वृक्षासोबत त्यांचा सेल्फी काढून तो शाळेत द्यावा, असेही आदेशात म्हटले आहे.