अकोला जिल्हय़ातील ९0 हजार कुटुंब शौचालयाविना!
By admin | Published: October 3, 2016 02:34 AM2016-10-03T02:34:54+5:302016-10-03T02:34:54+5:30
कुटुंबस्तर संवाद अभियानार्तंंंगत २४ हजार कुटुंबांना दिल्या भेटी!
अतुल जयस्वाल
अकोला, दि. 0२- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची महाराष्ट्रात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने २२ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या कालावधीत ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी-कुटुंबस्तर संवाद अभियानह्ण राज्यभर राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने या अभियानांतर्गत जिल्हय़ातील सात तालुक्यातील २४,२0६ कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या अभियानांतर्गत २८,0५४ कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश उद्दिष्ट गाठण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ह्यस्वच्छतेचा जागरह्ण करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत चालू वर्षातील शौचालयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, या कामांना गती देण्याच्या उद्देशाने २२ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर या कालावधीत ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी : कुटुंबस्तर संवादह्ण अभियान राबविण्यात आले. जिल्हय़ात आकोट तालुक्यातील पळसोद या गावातून २२ ऑगस्ट रोजी जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या हस्ते या अभियानास प्रारंभ करण्यात आला.
गत सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तालुका व पंचायत स्तर समिती स्तरावर गठित करण्यात आलेल्या पथक व समित्यांद्वारे गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देण्यात आल्या. लोकांना शौचालयांचे महत्त्व पटवून देऊन शौचालय उभारण्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनेची माहिती देण्यात आली. या अभियानामुळे लोकांमध्ये शौचालयांबाबत जनजागृती होऊन अनेकांनी शौचालयांचे बांधकामही केले आहे.
लाखांवर कुटुंबांनी शौचालय बांधले!
सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ातील २ लाख १२ हजार ६४१ कुटुंबांपैकी केवळ १ लाख २१ हजार ८३३ कुटुंबांनी शौचालयांचे बांधकाम केले आहे. अद्यापही ९0 हजार ८0८ कुटुंब शौचालयांविना असल्याने जिल्हा हगणदरीमुक्त होण्यात अडचणी येत आहेत.