अकोला : सोने लुटमार प्रकरणात पाचवा आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:46 AM2018-01-25T01:46:03+5:302018-01-25T01:46:14+5:30

अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्‍या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केली. हे आरोपी पोलीस कोठडीत असतानाच पोलिसांनी पाचव्या आरोपीस अटक केली. सुरेश रमेश महातो रा. कन्हाण असे आरोपीचे नाव आहे. नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील हे २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

Akola: The fifth accused in the case of gold looter | अकोला : सोने लुटमार प्रकरणात पाचवा आरोपी अटकेत

अकोला : सोने लुटमार प्रकरणात पाचवा आरोपी अटकेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्‍या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केली. हे आरोपी पोलीस कोठडीत असतानाच पोलिसांनी पाचव्या आरोपीस अटक केली. सुरेश रमेश महातो रा. कन्हाण असे आरोपीचे नाव आहे. नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील हे २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
  ठाणे क्राइम ब्रांचने अटक केलेल्या टोळीची चौकशी केल्यानंतर त्यांनी अकोल्यातील दोन किलो सोने लुटमार प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली होती. त्यांच्या अटकेसाठी रामदास पेठ पोलिसांचे पथक ठाण्यासाठी रवाना झाले होते. या चोरट्यांनी प्रशांत कुरियरचे संचालक प्रशांत शहा यांच्या कुरियर सर्व्हिसमध्ये आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिंमत आनंदराव काकडे हा कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांच्या दोन किलो सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली होती. हा प्रकार झाला तेव्हा हिंमत काकडे यांनी आरडाओरड न करता शहा हॉस्पिटलसमोर असलेल्या त्यांच्या मालकाकडे धाव घेतली होती. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला; मात्र जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटल्यावरही चोरट्यांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी या चोरट्यांची माहिती देणार्‍यांना ५0 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते; मात्र त्यानंतरही अकोला पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, ठाणे पोलिसांनी या चोरट्यांना पकडल्यानंतर रामदास पेठ पोलिसांना माहिती दिली. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील या चार चोरट्यांनी ही चोरी केल्याची क बुली दिली. 
रामदास पेठ पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली. त्यानंतर या चौघांच्या चौकशीतून कन्हाण येथील रहिवासी सुरेश रमेश महातो याला अटक केली. त्याच्यासह पाचही आरोपींना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Akola: The fifth accused in the case of gold looter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.