पहिली देशी बीटी कपाशी आली फूल-पात्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:47 PM2019-09-06T12:47:46+5:302019-09-06T12:47:55+5:30
हे पीक फूल-पात्यावर आले असून, यापासून चांगले उत्पादन मिळेल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन केलेल्या देशातील पहिल्या बीटी कपाशीची पेरणी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर करण्यात आली असून, सद्यस्थितीत हे पीक फूल-पात्यावर आले असून, यापासून चांगले उत्पादन मिळेल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पीकेव्ही हायब्रीड-२ तसेच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नांदेड-४४ (एनएच-४४) वाणात जनुकीय बदल करू न महाबीजने बीटी कापूस विकसित केला. बोंडअळी व रस शोषण करणाऱ्या किडींना प्रतिकारक्षम हे वाण असून, अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख, परभणीचे स्व. वसंतराव नाईक तसेच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रासह गुजरातमध्ये या वाणाचे मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक घेण्यात आले. याच दोन्ही संकरित वाणांमध्ये जनुकीय (बीटी जीन) बदल करू न बीटी वाण विकसित करण्यात आले. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना हे बियाणे उपलब्ध केले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन विभागातर्गत कृषी विद्या व पश्चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर या कपाशीच्या बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ही कपाशीची झाडे फुले-पात्यावर आली आहेत.
विदर्भातील शेतकºयांना यावर्षी पीकेव्ही हायब्रीड-२ बियाणे जवळपास २३ हजार ५०० पाकिटे विकण्यात आली होती तसेच नांदेड-४४ चे बियाणे मराठवाड्यात शेतकºयांनी खरेदी केले. विदर्भात सद्यातरी बीटी कपाशी उत्तम असून, शेतकºयांच्या शेतावरही चांगले परिणाम दिसून आले आहेत. या बीटीपासून हेक्टरी २० क्ंिवटलच्या अपेक्षा आहेत. कृषी विद्यापीठाच्या पश्चिम विभागावरील कपाशीला आलेली पिवळे, पांढरी फुले येणाºया जाणाºयांना आकर्षित करीत आहेत.
बीजी-२ कपाशी सध्या बºयापैकी आली असून, फुले-पात्या धरले आहे. आपले हे पहिले संशोधन आहे. उत्पादनही चांगले येण्याची शक्यता आहे.
- डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.