अकोला : इलियास हत्याकांडात पाच आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:14 AM2018-01-03T02:14:19+5:302018-01-03T02:17:25+5:30
अकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या केल्यानंतर अकोट फैल पोलिसांनी या हत्याकांडातील पाच आरोपींना अटक केली आहे. तर त्याच्या मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या केल्यानंतर अकोट फैल पोलिसांनी या हत्याकांडातील पाच आरोपींना अटक केली आहे. तर त्याच्या मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेला इल्लू ऊर्फ इलियास हसन पटेल (३५, रा. शंकर नगर) हा रविवारी रात्री दारूच्या नशेत असताना कुटुंबातील सदस्यांना त्रास देत होता. १७ वर्षाच्या मुलीसह दोन्ही मुलींचा ताबा घेण्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला तो पत्नी राहत असलेल्या ठिकाणी गेला; मात्र रात्रीच्या सुमारास सासरा शेख मोहम्मद शेख रन्नू, सासू शयदाबी शेख मोहम्मद, साळू गुलाम चांद गुलाम रियाझ, पत्नी शबाना परवीन इलीयास पटेल या चार जणांसह साळू गुलाम चांदचे मित्र शेख रिजवान शेख लुकमान, शेख तौफिक शेख युनूस यांनी इलीयासची हत्या करून मृतदेह नेऊन टाकला होता. याप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात मृताचा भाऊ अमीर हसन पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख मो. शेख रन्नू (सासरा), शाहिदाबी शेख मोहम्मद (सासू), गुलाम चाँद गुलाम रियाज (साडू), शबाना परवीन इलियास (पत्नी) व शेख रिजवान शेख लुकमान, शेख तौफिक शेख युनूस यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याला मृतावस्थेत रेल्वेट्रॅकजवळ नेऊन टाकण्यासाठी गुलाम चांद याचे मित्र शेख रिजवान शेख लुकमान, शेख तौफिक शेख युनूस यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना शनिवारपयर्ंत पोलीस कोठडीतठेवण्याचे आदेश बजाविलेत. दरम्यान, त्याच्या पत्नीची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
-