माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 10:12 AM2020-10-27T10:12:06+5:302020-10-27T10:16:56+5:30
Former BJP MLA Jagganath Dhone passes away माजी आमदार जग्गनाथ ढोणे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले.
लोकमत न्युज नेटवर्क
पातुर : पातुरसारख्या आदिवासी दुर्गम भागातील लोकांसाठी पहिले आयुर्वेद महाविद्यालय उभारणारे माजी आमदार जग्गनाथ ढोणे यांचे मंगळवारी पहाटे दोन वाजता निधन झाले. मृत्युसमयी ते६६ वर्षाचे होते. दुपारी 12-30 वाजता पातूर येथील डॉ. वंदनाताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरातील डॉ .वंदनाताई ढोणे स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
२०आक्टोबर १९५४रोजी पातुर तालुक्यातील आलेगांव येथे विश्वहिंदु परिषदेचे बाबासाहेब ढोणे यांच्यापोटी त्यांचा जन्म झाला. त्यांना पाच भाऊ आणि दोन बहिणी आहेत.
डॉ जग्गनाथ ढोणे विदर्भाचे पहिले गैस्ट्रोकोपी तज्ञ होते.पातुर तालुका अतिशय दुर्गम आणि मागासलेल्या भागातील नागरिकांसाठी प्रियदर्शनी आदिवासी ऊत्कर्ष फाऊंडेशन, नवेगाव च्या नावानं शिर्ला ग्रामपंचायत क्षेत्रात पातुर बाळापूर रोडवर पातुर शहरालगत डॉ वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालय स्थापन केले.त्याबरोबरच आडगाव,अकोट,तेल्हारा तळेगाव , अकोला सह मेळघाटातील डाबका,धुरळा आदी ठिकाणी शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या प्रामुख्याने ह्या सुविधा दुर्गम भागातील लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या हे विशेष!
९०-९५या कालावधीमध्ये त्यांनी अकोट विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून विधानसभेत गेले,ते महाराष्ट्र आरोग्य सल्लागार समितीचे अध्यक्ष होते
ओबिसीच्या प्रश्न मांडले. त्यावर एक पुस्तक प्रकाशित केले.स्वतंत्र विदर्भ लढा लढला, जांबुवंतराव धोटे,अरुण अडसूळ, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काम केलं. सध्या ते भारतीय जनता पक्षात कार्यरत होते.
दिवंगत जगन्नाथ ढोणे यांना सतत कार्यरत राहण्याची आवड होती. सोमवारी पातुर तालुक्यातील मोर्णा धरणावर पर्यटन विकास करण्यासाठी दिवसभर कार्यरत होते. त्यांचे समवेत माजी आमदार गजानन दाळू गुरुजी आणि माजी आमदार तुकाराम बिरकड समवेत होते. कालचा दिवस कामात व्यस्त आणि त्यांनी आनंदात घातला.
कोरोनावर केली होती मात
अवघ्या सात दिवसांपुर्वी वाढदिवस साजरे करणारे डॉ जग्गनाथ ढोणे यांनी नूकतीच कोरोनावर मात केली होती मात्र सोमवारी सकाळी दोन-तीन वाजता लघूशंकेला जाण्यासाठी बाथरूम कडे जाताना जागेवरच कोसळले त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती सुत्रांनी दिली