अकोला : शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर महिला कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:50 AM2017-12-23T01:50:38+5:302017-12-23T01:54:03+5:30

अकोला: विविध मागण्यांना घेऊन २0 ते २५ महिला कामगारांनी शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. दरम्यान आंदोलनातील एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाही. 

Akola: In front of the Mahabeej office of Shishan, women worker's self-interest attempt | अकोला : शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर महिला कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला : शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर महिला कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देविविध मागण्यांना घेऊन २0 ते २५ महिला कामगारांनी शुक्रवारी दुपारी महाबीजच्या कार्यालयासमोर आंदोलन केलेआंदोलनातील एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विविध मागण्यांना घेऊन २0 ते २५ महिला कामगारांनी शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. दरम्यान आंदोलनातील एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाही. 
महाबीजमध्ये रोजंदारीवर काम नसेल, तर मजुरी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती आहे. महिला कामगारांना आपले काम बंद होईल, अशी भीती निर्माण झाली. त्यामुळे महिला कामगारांनी शिवणी येथील महाबीज कार्यालयात आंदोलन केले. या आंदोलनात २0 ते २५ महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान एका महिलेने अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी तिच्याजवळील रॉकेलची बाटली हिसकावून घेतली आणि तिला ताब्यात घेतले. मात्र, महाबीज प्रशासनाकडून महिलेविरूद्ध तक्रार नसल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली नाही. 

Web Title: Akola: In front of the Mahabeej office of Shishan, women worker's self-interest attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.