अकोला :‘वंचित ’ च्या अघोषित बहिष्कारात अकोला पंचायत समितीची आमसभा !

By संतोष येलकर | Published: April 4, 2023 06:33 PM2023-04-04T18:33:34+5:302023-04-04T18:33:42+5:30

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अकोला पंचायत समितीची वार्षिक आमसभा व सरपंच शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Akola: General meeting of Akola Panchayat Samiti in undeclared boycott of 'Vanchit'! | अकोला :‘वंचित ’ च्या अघोषित बहिष्कारात अकोला पंचायत समितीची आमसभा !

अकोला :‘वंचित ’ च्या अघोषित बहिष्कारात अकोला पंचायत समितीची आमसभा !

googlenewsNext

अकोला- जिल्हयातील सर्वात मोठी पंचायत समिती असलेल्या अकोला पंचायत समितीची आमसभा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात आली. परंतू पंचायत समितीमध्ये सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे उपसभापती, सदस्य आणि तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य या आमसभेला अनुपस्थित होते. त्यामुळे ‘वंचित’ च्या अघोषित बहिष्कारातच अकोला पंचायत समितीची आमसभा पार पडली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अकोला पंचायत समितीची वार्षिक आमसभा व सरपंच शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या आमसभेला शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, अकोला पंचायत समितीच्या सभापती सुलभा सोळंके, जिल्हा परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता गोपाल दातकर, पंचायत समिती सदस्य सदस्य भारत बोरे, लखुआप्पा लंगोटे, भास्कार अंभोरे, शुभांगी भटकर, विजय बाभुळकर, गजानन वानखडे, जयश्री गावंडे, सुषमा ठाकरे , गटविकास अधिकारी कालीदास तापी यांच्यासह संबंधित अधिकारी व तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. परंतू २० सदस्यीय अकोला पंचायत समितीमध्ये सर्वाधिक ११ सदस्यसंख्या असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अकोला पंचायत समितीचे उपसभापती व सदस्य आणि अकोला पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष या बैठकीला अनुपस्थित होते. त्यानुषंगाने अकोला पंचायत समितीमध्ये सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या वंचित बहुजन आघाडी सदस्यांच्या अघोषित बहिष्कारातच अकोला पंचायत समितीची आमसभा पार पडल्याचे चित्र दिसत होते.

६४ खेड्यातील पाणी प्रश्न गाजला; नियमीत पाणीपुरवठ्याचे निर्देश !

अकोला तालुक्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना नियमीत पाणीपुरवठा होत नसून, १२ ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी हेलपाटे सहन करावे लागत असल्याचा मुद्दा काही सदस्यांसह सरपंचांनी या आमसभेत लावून धरला. त्यामुळे या प्रश्नावर पंचायत समितीची आमसभा चांगलीच गाजली. या पार्श्वभूमीवर योजनेंतर्गत प्रत्येक गावाला नियमीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात नियोजन करण्याचे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच घरकूल आणि पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही आमसभेत देण्यात आल्या.

Web Title: Akola: General meeting of Akola Panchayat Samiti in undeclared boycott of 'Vanchit'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.