Akola GMC : डिजिटल एक्स-रे मशीनला इन्स्टॉलेशनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 02:53 PM2020-02-10T14:53:49+5:302020-02-10T14:54:04+5:30

अद्यापही डिजिटल एक्स-रे मशीनचे इन्स्टॉलेशन झाले नाही.

 Akola GMC: Digital X-ray machine awaiting installation | Akola GMC : डिजिटल एक्स-रे मशीनला इन्स्टॉलेशनची प्रतीक्षा

Akola GMC : डिजिटल एक्स-रे मशीनला इन्स्टॉलेशनची प्रतीक्षा

googlenewsNext

अकोला : अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने आजारांचे निदान व्हावे, यासाठी सर्वोपचार रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन दाखल झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मितीही करण्यात आली आहे; मात्र अद्यापही डिजिटल एक्स-रे मशीनचे इन्स्टॉलेशन झाले नाही.
विविध आजारांच्या निदानासाठी सर्वोपचार रुग्णालयात एक्स-रे सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी रुग्णांच्या आजाराचे निदान तर होते; पण रुग्णांना एक्स-रे फिल्म दिली जात नाही. त्यामुळे रुग्ण पुढील उपचारासाठी खासगी किंवा अमरावती किंवा नागपूरला गेल्यास त्याला एक्स-रे फिल्मसाठी स्वतंत्र मागणी करावी लागते. या प्रक्रियेत रुग्णाचा वेळही जातो. हा प्रकार टाळण्यासाठी तसेच आजारांचे निदान अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे या उद्देशाने डिजिटल एक्स-रे मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली; मात्र अद्यापही या एक्स-रे मशीनचे इन्स्टॉलेशन झालेले नाही. त्यामुळे रुग्णांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे आजाराच्या निदानासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रखडली असून, लवकरच रुग्ण सेवेत ही एक्स-रे मशीन येणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एक्स-रे’ची मिळणार डिजिटल प्रिंट
आतापर्यंत रुग्णांना एक्स-रे फिल्म दिली जायची. काही दिवसांपासून ही फिल्म देणेही बंद करण्यात आले; मात्र डिजिटल एक्स-रे मशीनच्या इन्स्टॉलेशननंतर रुग्णांना डिजिटल प्रिंट दिली जाणार आहे.

 

Web Title:  Akola GMC: Digital X-ray machine awaiting installation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.