विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला ‘जीएमसी’च्या विद्यार्थीनी अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:14 PM2018-02-28T17:14:48+5:302018-02-28T17:18:10+5:30

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी पार पडलेल्या विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावला.

Akola 'GMC' tops in Vidarbha-level inter-collegiate quiz competition! | विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला ‘जीएमसी’च्या विद्यार्थीनी अव्वल!

विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला ‘जीएमसी’च्या विद्यार्थीनी अव्वल!

Next
ठळक मुद्देअसोसिएशन आॅफ क्लिनिकल बायोकेमेस्ट आॅफ इंडिया आणि जीवरसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी येथे प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत विदर्भातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या दहा चमूंनी भाग घेतला होता. यामध्ये अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गायत्री देशमुख आणि महिमा कोठारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी पार पडलेल्या विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावला.
असोसिएशन आॅफ क्लिनिकल बायोकेमेस्ट आॅफ इंडिया आणि जीवरसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी येथे प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विदर्भातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या दहा चमूंनी भाग घेतला होता. यामध्ये अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गायत्री देशमुख आणि महिमा कोठारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शासकीय महाविद्यालय, नागपूर येथील निखिल सोनुने व अद्वैत पाखमोडे यांनी द्वितीय, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील अंजानी शुक्ला व सौरभ सुनिलकुमार यादव यांच्या चमूने तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, असोसिएशन आॅफ क्लिनिकल बायोकेमेस्ट आॅफ इंडिया (विदर्भ)चे सचिव डॉ. सुरेश चारी यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. डॉ. जिया खान, डॉ. अशोक राठी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. कुमुद हरले, डॉ. नरेंद्र डांगे, डॉ. शामली जुनगरे, डॉ. प्रेरणा नांदेडकर, डॉ. शिल्पा कासट, डॉ. निलेश खानझोडे, डॉ. रुची सारडा, डॉ. रिचा सिसोदिया, डॉ. दिपाली काळे यांनी सहकार्य केले.


 

Web Title: Akola 'GMC' tops in Vidarbha-level inter-collegiate quiz competition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.