अकोल्याच्या शासकीय दूध योजनेला मिळाली १0 टन भुकटी!
By admin | Published: January 14, 2017 12:41 AM2017-01-14T00:41:59+5:302017-01-14T00:41:59+5:30
मागणीनंतर झाला उशिरा पुरवठा; योजनेने केला वापर सुरू
अकोला, दि. १३- राज्यातील शासकीय दूध योजनांना मागणीनुसार दूध भुकटीचा पुरवठा शासनामार्फत केल्या जातो; पण अनेक ठिकाणी उशिरा या भुकटीचा पुरवठा करण्यात आल्याने, दुधाची आवक जास्त असताना शासकीय दूध योजनांना या भुकटीचा वापर करावा लागत आहे. अकोल्याच्या शासकीय दूध योजनेलाही १0 टन भुकटी मिळाली आहे.
मार्च ते ऑगस्ट या कालावधीत शासकीय दूध योजनांकडे येणार्या दुधाची आवक कमी असते. त्याची पूर्तता करण्यासाठी या योजनांकडून शासनाच्या दूध भुकटी प्रकल्पाकडे दूध भुकटीची मागणी नोंदविल्या जाते. ही भुकटी वापरू न नागरिकांची दुधाची मागणी पूर्ण केली जाते. अकोल्याच्या शासकीय दूध योजनेनेही मागील वर्षीच्या मार्च ते ऑगस्ट या कालावधीकरिता दूध भुकटीची मागणी नोंदविली होती; परंतु शासनाने ही भुकटी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये १0 टन जवळपास ३0 लाख रुपयांची दूध भुकटी पाठविली. ही भुकटी वापरण्याची मुदत (एक्सपायरी) जून २0१७ पर्यंत आहे. या योजनेकडे अकोला, बुलडाणा व वाशिम तीन जिल्हे मिळून जवळपास २,१00 लीटर दुधाची आवक आहे. या योजनेने गुरुवारपासून या भुकटीचा वापर दुधात सुरू केला आहे.
- प्रोटीनयुक्त भुकटी!
भुकटीमध्ये प्रोटीन असते. ही भुकटी वापरल्याने दुधाची घनता वाढून घट्ट होते. प्रोटीन असल्याने दुधाची प्रत चांगली होते. खासगी दूध कंपन्या दुधात घनता, यावी याकरिता इतर प्रयोग करतात; परंतु शासकीय दूध योजना प्रोटीन वावरते, हा शासकीय दूध योजनेच्या अधिकार्यांचा दावा आहे.
- मागणी मार्चमध्ये केली असली, तरी लगेच पुरवठा होत नसतो. नोव्हेंबरमध्ये प्राप्त झालेली भुकटी वापरणे सुरू केले आहे. जूनपर्यंत ही भुकटी वापरायची आहे. शासकीय दूध योजनेच्या भुकटीमध्ये प्रोटीन असून, दुधाची घनता वाढल्याने या दुधाची वितरकामध्ये मागणी वाढली आहे. खासगी कंपन्यांच्या दुधापेक्षा योजनेच्या दुधाची प्रत सुधारली आहे.
डॉ.एस.बी. दुधाने,
व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, अकोला.