अकोला गारठले : तापमानाचा पारा १0 अंशा खालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:38 AM2017-12-29T01:38:16+5:302017-12-29T01:38:40+5:30
अकोला : गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले आहे. सरासरीपेक्षा ५ अंशांनी तापमान कमी झाल्यामुळे शहरात शीतलहर जाणवू लागली आहे. वाढत्या थंडीमुळे संपूर्ण शहरासह जिल्ह्याला हुडहुडी भरल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

गेल्या ४ दिवसांपासून पारा १0 अंशांच्या खाली घसरला आहे. थंड वार्यांचा जोर वाढला आहे. हवामान खात्यानुसार देशाच्या उत्तर भागात होत असलेली बर्फवृष्टी व वातावरणातील आद्र्रता वाढल्यामुळे थंडी वाढली आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची चिन्हे आहेत. बुधवारी अकोल्याचे किमान तापमान ९.४ अंश होते. गुरूवारी त्यात 0.२ अंशांनी वाढ झाली असली तरी थंडीचा कडाका कमी झाल्याचे जाणवत नव्हते. दरम्यान पुढील ४८ तासांपर्यंत थंडीची ही लाट कायम राहील अशी माहिती हवामान खात्याने प्रसिद्धीस दिली आहे.