अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटलांनी साधला नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:47 PM2018-01-05T18:47:12+5:302018-01-05T18:54:04+5:30
अकोला: बाभुळगाव परिसरातील जवाहर नवोदय विदयालयाला पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन प्राचार्य, शिक्षक व विदयार्थी यांच्याकडून तेथील समस्या जाणून घेतल्या.
अकोला: बाभुळगाव परिसरातील जवाहर नवोदय विदयालयाला पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन प्राचार्य, शिक्षक व विदयार्थी यांच्याकडून तेथील समस्या जाणून घेतल्या. पाणी टंचाईचा सामना करणाºया या विद्यालयाच्या परिसरात जिल्हा नियोजनमधून एक विहीर खोदण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यालयातील विविध समस्यांबाबत पालकांच्या आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत शुक्रवारी सकाळी स्वत: पालकमंत्र्यांनी विद्यालयात जाऊन सर्वप्रथम सर्व वर्गखोल्यांची पाहणी केली. उपस्थित विद्यार्थ्यांची जिव्हाळयाने चौकशी केली. त्यांना कोणकोणत्या समस्या भेडसावतात याबाबतची माहिती जाणून घेतली. वगार्तील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील वातावरण, मेसमधून मिळणारा नाष्टा व जेवणाची गुणवत्ता, पाण्याची समस्या याबाबत चौकशी केली. तसेच आंघोळीसाठी गरम पाणी मिळते का याविषयी विद्यार्थ्यांना विचारणा केली.
यानंतर विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाला भेट देऊन पाहणी केली. तेथील वीज, पाणी तसेच सीसीटीव्हीबाबत त्यांनी चौकशी केली. विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या खोलीची पाहणी करुन तेथील व्यवस्थेबाबत प्राचार्यांकडे विचारणा केली. पाणीटंचाईची समस्या भेडसावणाºया या विद्यालयाला सध्या टँकरने पाणी पाणीपुरवठा होत आहे. यावर उपाय म्हणून पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून एक विहीर खोदण्यात येणार असल्याचे सांगितले. गरम पाण्यासाठी गिझर दुरुस्त करण्याची सूचना त्यांनी यावेळी प्राचार्यांना केली. इतर मुलभूत समस्यांचेही तातडीने निराकरण करण्याबाबत त्यांनी सूचित केले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या सुमन बैलमारे, उपप्राचार्य डी.एस. थूल हे उपस्थित होते.