अकोला :  नवीन किराणा बाजारातून गुटख्याची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:37 AM2020-04-22T10:37:38+5:302020-04-22T10:37:45+5:30

धान्याच्या ट्रकमधून गुटख्याचे पोते ने-आण करून पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.

Akola: Gutkha turnover from new grocery market! | अकोला :  नवीन किराणा बाजारातून गुटख्याची उलाढाल!

अकोला :  नवीन किराणा बाजारातून गुटख्याची उलाढाल!

googlenewsNext

- सचिन राऊत  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूमुळे २२ मार्चपासून लॉकडाउन तसेच संचारबंदी असल्याने पाणटपऱ्या व गुटखा विक्री करणाºया किरकोळ दुकानदारांना गुटखा मिळत नसल्याने ते बंद करण्यात आली होती; मात्र आता धान्याची वाहतूक करणाºया ट्रकमधून नव्या गुटखा माफियांनी नवीन किराणा बाजारातून गुटख्याची देवाण-घेवाण सुरू केल्याची माहिती आहे. धान्याच्या ट्रकमधून गुटख्याचे पोते ने-आण करून पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.
कोरोनामुळे अचानकच संचारबंदी लावण्यात आली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. यासोबतच गुटखा व पानमसाला विक्री करणाºया पानटपºया तसेच छोटी दुकानेही बंद करण्यात आल्यामुळे पानमसाला खाणाऱ्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. शहरातील गुटखा माफियांकडे असलेल्या गुटख्याची विल्हेवाट लागल्यानंतर नवीन किराणा बाजारात दोन नवे गुटखा माफिया सक्रिय झाले असून, त्यांनी या ठिकाणावरून गुटख्याची उलाढाल सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे. किराणा बाजारातून तालुक्याचे ठिकाण तसेच मोठ्या खेड्यांमध्ये धान्याची वाहतूक करणाºया ट्रकची ये-जा सुरू असल्याने याच ट्रकमधून गुटख्याची ने-आण करण्यात येत असून, शहरातही याच वाहनांनी पानटपरीचालकांना गुटखा पोहोचविण्यात येत असल्याचे वास्तव आहे.
एखाद्या मुख्य चौकात किंवा निर्जनस्थळी ट्रक उभा केल्यानंतर त्या परिसरातही पाणटपरीचालकांना गुटखा देण्यात येतो. तेथून पाणटपरीचालक त्यांच्या ग्राहकांना अधिक दराने गुटखा विक्री करण्याचे काम करीत आहेत. नवीन किराणा बाजारातील या दोन गुटखा माफियांमुळे आता जिल्ह्यात गुटख्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती असून, त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या गुटखा माफियांमुळे आता धान्याची ने-आण करणाºयांनाही त्रास होणार असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे दोन गुटखा माफियांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करून त्यांना क्वारंटीन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अमरावतीमधून खामगावात पोहोचला ट्रक
दरम्यान सोमवारी सकाळी पोलिसांनी खामगावात एक धान्याचा ट्रक पकडल्यानंतर त्यामधील धान्याची तपासणी केली असता, या ट्रकमध्ये गुटख्याचीही पोती असल्याचे उघड झाले. अमरावती येथून आलेल्या या ट्रकमध्ये खामगावातील गुटखामाफियांचा गुटखा आणण्यात आल्याचे उघड झाले होते. यावरुन गुटखा माफियांकडून कोरोनामुळे लावण्यात आलेली संचारबंदी पायदळी तुडविण्यात येत असल्याचे वास्तव आहे.


या गुटख्याची होतेय उलाढाल
काली बहार, निली बहार, नजर, विमल, रोकडा गुटखा, कर्मचंद गुटखा यासह विविध गुटख्यांची वाहतूक करण्यात येत आहे. दोन गुटखा माफियांकडून ही उलाढाल सुरु असल्याने याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.


२ रुपयांची पुडी १० रुपयांना
गुटख्याची मोठ्या प्रमाणात ब्लॅकने विक्री करण्यात येत आहे. २ ते ३ रुपयांची पुडी तब्बल १० रुपयांना विक्री करण्यात येत आहे. यावरुन गुटखा माफियांचे चांगलेच फावले आहे. खामगावसोबत अकोल्यातही गुटखा माफियांचा मोठा माल येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Akola: Gutkha turnover from new grocery market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला