कोरोनाचे सर्वाधिक ५४५ बळी अकोला शहरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:32+5:302021-06-03T04:14:32+5:30
तालुकानिहाय वर्षभरातील स्थिती क्षेत्र - मृत्यू मनपा ...
तालुकानिहाय वर्षभरातील स्थिती
क्षेत्र - मृत्यू
मनपा - ५६५
अकोला - ७८
बाळापूर - ८८
बार्शिटाकळी -६३
अकोट -११९
तेल्हारा - ४२
मूर्तिजापूर - ७३
पातूर - ५०
-----------------------
एकूण - १,०७८
ही आहेत मृत्यूची कारणे-लक्षणांकडे दुर्लक्ष करीत अनेकांनी प्रारंभीचे सहा ते सात दिवस घालविले घरगुती उपचारात.
उशिरा उपचारास सुरुवात, रुग्णांच्या शरीराने दिला नाही प्रतिसाद.
व्हेंटिलेटर न मिळाल्यानेही काहींचा मृत्यू.
ऑक्सिजनचा तुटवडाही ठरला मृत्यूस कारणीभूत.
तर मृत्यू राेखता आले असते...
कोविडच्या उपचाराचे पहिले दहा दिवस महत्त्वाचे आहेत.
पहिल्या तीन दिवसांतच उपचारास सुरुवात होणे गरजेचे.
त्यासाठी वेळेत निदान होणे आवश्यक.
उपचारास योग्य दिशा महत्त्वाची.