CoronaVirus : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अकोल्यात सर्वाधिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:54 AM2020-08-31T10:54:08+5:302020-08-31T10:54:20+5:30
. अकोल्यातील एकूण रुग्णसंख्येच्या ८१.३६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून, त्या पाठोपाठ अमरावती आणि अकोला जिल्ह्याचा क्रमांक लागतो. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक दर अकोला जिल्ह्याचा आहे. अकोल्यातील एकूण रुग्णसंख्येच्या ८१.३६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
अकोल्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर विदर्भात कोरोनाचा नवा हॉसस्पॉट झाला होता. मे, जून महिन्यात रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यूदराच्या बाबतीत अकोला जिल्हा विदर्भात अव्वल स्थानी होता; मात्र जुलै महिन्याच्या अखेरनंतर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर झपाट्याने वाढू लागला. अशातच अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्यात ८१.३६ टक्के कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.७९ टक्के असून, हा जिल्हा विदर्भात दुसऱ्या स्थानी असल्याचे सर्वाजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमातून समोर आले आहे.
सर्वाधिक मृत्यूदर चिंताजनक!
विदर्भात रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत अकोला जिल्ह्याची स्थिती चांगली असली, तरी मृत्यूदराच्या बाबतीत ही स्थिती तेवढीच चिंताजनक आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.९३ असून, विदर्भातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत तो सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी ०.८ टक्के मृत्यूदर चंद्रपूर जिल्ह्याचा आहे.