अकोल्याचे तापमान विदर्भात सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 11:05 AM2021-04-05T11:05:30+5:302021-04-05T11:05:38+5:30
Akola has the highest temperature in Vidarbha: रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.१ अंश सेल्सिअस होते.
अकोला : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा चांगलाच तडाखा बसत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.१ अंश सेल्सिअस होते. हे विदर्भातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. दोन दिवसात आणखी पारा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या तापमानात गेल्या आठ दिवसांपासून चढ-उतार होत आहे. अकोल्यात सलग दोन दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने उष्णतेची लाट कमी झाली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. पण काल आणि आज पुन्हा तापमानात वाढ झाल्याने अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा पारा ४२.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने रस्त्यावर सकाळी दहानंतर गर्दी कमी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या दैनंदिन कामावरही परिणाम झाला. उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी येथील नागरिकांनी शीतपेयांपासून ते भर दुपारी तळ्यावर जाऊन अंघोळ करण्यापर्यंतचे उपाय योजले आहेत. उन्हाची लाट आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
विदर्भातील सर्वाधिक तापमानाचे जिल्हे
अकोला ४२.१
चंद्रपूर ४२.०
यवतमाळ ४१.५
अमरावती ४१.४
ब्रह्मपुरी ४१.३