कुडो स्पर्धेत अकोल्याला पाच पदक

By admin | Published: November 4, 2016 02:22 AM2016-11-04T02:22:12+5:302016-11-04T02:22:12+5:30

सुरत येथे पार पडलेल्या आठव्या कुडो स्पर्धेत अकोला कुडो असोसिएशनच्या खेळाडूंनी पाच पदकांची कमाई.

Akola has won five medals in the Kudo tournament | कुडो स्पर्धेत अकोल्याला पाच पदक

कुडो स्पर्धेत अकोल्याला पाच पदक

Next

अकोला, दि. ३- सुरत येथे पार पडलेल्या आठव्या अक्षयकुमार कुडो स्पर्धेत अकोला कुडो असोसिएशनच्या खेळाडूंनी पाच पदकांची कमाई केली. स्पर्धेचे आयोजन इंडिया कुडो असोसिएशन व सुरत कुडो असोसिएशनच्या वतीने केले होते. स्पर्धा असोसिएशनचे चेअरमन अभिनेता अक्षयकुमार यांच्या देखरेखीत पार पडली.
स्पर्धेत आकाश बालखंडे, मयूर इंगळे यांनी रौप्यपदक पटकाविले. वैष्णवी राजपूत, साक्षी गिर्‍हे व राहुल आठवले यांनी कांस्यपदक मिळविले. खेळाडूंना अँड. पप्पू मोरवाल, प्रशिक्षक मनोज अंबेरे यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: Akola has won five medals in the Kudo tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.