Akola: अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला मुदतवाढ

By Atul.jaiswal | Published: August 27, 2023 03:04 PM2023-08-27T15:04:32+5:302023-08-27T15:04:59+5:30

Akola: दक्षिण भारतातून पश्चिमेकडील राजस्थान राज्यात अकोला मार्गे जाणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस व काचीगुडा-बिकानेर या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेने घेतला आहे.

Akola: Hyderabad-Jaipur, Kachiguda-Bikaner Express running via Akola extended | Akola: अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला मुदतवाढ

Akola: अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला मुदतवाढ

googlenewsNext

- अतुल जयस्वाल
अकोला - दक्षिण भारतातून पश्चिमेकडील राजस्थान राज्यात अकोला मार्गे जाणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस व काचीगुडा-बिकानेर या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेने घेतला आहे. अल्पावधितच अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या गाड्यांच्या आणखी काही फेऱ्या होणार असल्याने अकोलेकर प्रवाशांची सुविधा होणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७११५ हैदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष गाडी १ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर शनिवारी सकाळी ५:४० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७११६ जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी ३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर सोमवारी दुपारी ३:१० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसच्या पाच फेऱ्या
गाडी क्र. ०७०५३ काचीगुडा-बिकानेर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी रात्री ९:३० वाजता काचीगुडा येथून प्रस्थान करून सोमवारी दुपारी १:५० वाजता बिकानेर स्थानकावर पोहोचणार आहे. अकोला स्थानकावर ही गाडी रविवारी सकाळी ९:२० वाजता येणार आहे.

परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५४ बिकानेर-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधित दर मंगळवारी रात्री ८:१५ वाजता बिकानेर येथून रवाना होऊन गुरुवारी सकाळी ९:४० वाजता काचीगुडा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी बुधवारी रात्री ९:२५ वाजता अकोला स्थानकावर येईल. या गाडीच्या अप व डाऊन अशा पाच फेऱ्या होणार आहेत.

Web Title: Akola: Hyderabad-Jaipur, Kachiguda-Bikaner Express running via Akola extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.