अकोला : ‘सर्वोपचार’मधील कक्ष सेविकांचे बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:36 PM2018-01-03T14:36:27+5:302018-01-03T14:41:42+5:30
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गत १५ वर्षांपासून ठेकेदारी पद्धतीत रोजंदारीवर काम करणाऱ्या सहा कक्ष सेविकांनी त्यांना चतुर्थश्रेणी बाह्यस्रोत कर्मचारी पदभरतीत डावलण्यात आल्याचा आरोप करीत, या पदभरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीसाठी या सहा कक्ष सेविका आणि एक सफाई कामगार यांनी मंगळवार, २ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. बुधवार, ३ जानेवारी रोजीही या कक्षसेविकांचे उपोषण सुरुच होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात बाह्यस्रोत कर्मचाºयांचे कंत्राट मुंबई येथील एका कंपनीस देण्यात आले आहे. सदर कंपनीने कर्मचाऱ्यांची पदभरती करताना येथे अगोदरच कार्यरत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सामावून घेतले; परंतु काही कक्ष सेविकांना पदभरतीतून डावलण्यात आले. सदर कक्ष सेविका ५० रुपये रोजंदारीवर वर्ष २००२ पासून कार्यरत आहेत. बाह्यस्रोत कर्मचारी भरतीत रुजू करून घेण्याची विनंती त्यांनी १९ डिसेंबर रोजी लेखी निवेदनाद्वारे अधिष्ठात्यांकडे केली होती; परंतु तसे न झाल्यामुळे या कक्ष सेविकांनी १ जानेवारीपर्यंत बाह्यस्रोत कर्मचारी भरतीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतरही मागणी मान्य न झाल्याने जया कल्याणी, भारती पवार, अनुराधा तायडे, अलका कदम, लक्ष्मी डोंगरे, संध्या बनसोड आणि सफाई कामगार राशीदा शे. मुश्ताक यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. दरम्यान, बुधवारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी उपोषण करणाºया कक्षसेविकांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.