अकोला : महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ ब्रिगेडची संघटन बांधणीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:43 PM2017-12-18T17:43:41+5:302017-12-18T17:46:01+5:30

अकोला: राष्ट्र निमार्णाकरीता समाजातील स्त्रीयांना एकसंघ करुन त्यांच्या सक्षमीकरणाकरीता जिजाऊ ब्रिगेडने संघटन बांधणीवर अधिक भर देण्यात येणार आहे. याकरीता ग्राम पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत नियोजनात्मक बांधणी करण्यात येणार आहे

Akola: Jijau Brigade , emphasize on empowerment of women | अकोला : महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ ब्रिगेडची संघटन बांधणीवर भर

अकोला : महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ ब्रिगेडची संघटन बांधणीवर भर

googlenewsNext
ठळक मुद्देजिजाऊ ब्रिगेडची केंद्रीय कार्यकारणीची बैठक : आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्साचे नियोजनइंदू देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी पुर्ननियुक्ती : विविध जिल्हांच्या त्रैमासिक अहवालाचे वाचनगाव तिथे वाचन कट्टा जिजाऊ ब्रिगेडचे ब्रिदवाक्य.


अकोला: राष्ट्र निमार्णाकरीता समाजातील स्त्रीयांना एकसंघ करुन त्यांच्या सक्षमीकरणाकरीता जिजाऊ ब्रिगेडने संघटन बांधणीवर अधिक भर देण्यात येणार आहे. याकरीता ग्राम पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत नियोजनात्मक बांधणी करण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रिय जिजाऊ जन्मोत्साचे नियोजनाकरीता विविध कृतिशिल उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे एकमत जिजाऊ ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आले.
जिजाऊ ब्रिगेडच्या विविध उपक्रम, आढावा, आंतरराष्ट्रिय जिजाऊ जन्मोत्सवाच्या नियोजनाकरीता केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण, महासचिव पुनम पारसकर, कार्याध्यक्ष माधुरी भदाणे, केंद्रिय कार्यकारणीच्या मयुरा देशमुख, जिल्हाध्यक्ष इंदू देशमुख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रारंभी मातृसत्ताक पध्दतीने जिजाऊ, सावित्री यांच्या प्रतिमांचे पूजन, दिपप्रज्वलन, हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष इंदू देशमुख यांनी केले. जिजाऊ ब्रिगेडने गाव, सर्वष्ठल, शहर, तालुका, जिल्हापातळीवर महिलांची संघटनात्मक बांधणी करण्याकरीता पुढाकार द्यावा. समाजातील प्रत्येक स्त्रीचे सक्षमीकरण करण्याकरीता कृतिशिल उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण यांनी मांडले. जिजाऊ ब्रिगेडचे संघठन अधिक भक्कम होण्यासाठी कोण कोणते उपक्रम घेता येतील, संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा याबाबत प्रदेश कार्याध्यक्ष माधुरी भदाणे यांनी विचार मांडले. तर प्रदेश महासचिव पूनम पारसकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त कथन करून जिजाऊ ब्रिगेडचे उपक्रम, कार्यक्रम, नियोजनाची माहिती दिली. सोबतच आंतरराष्ट्रिय जिजाऊ जन्मोत्साचे नियोगजन, संगठन बांधणी, मराठा मार्गचे सभासद वाढवणे, विविध जिल्हांचा आढावा, कृतिशिल उपक्रम आदी बाबींवर विचारमंथन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरेखा राऊत तर आभार प्रदर्शन उज्वला पुंडकर यांनी केले. डॉ. मोनिका तराळे, जया जायले, सविता जायले, स्वाती हिंगणकर, संध्या देशमुख, पुष्पा देशमुख, अर्चना बोचे, मिनल सरप, रेणू गावंडे, निशा जायले, सविता मोरे, बेबी तोरखडे, वनिता गावंडे आदींनी कार्यक्रमाकरीता पुढाकार घेतला.



 

Web Title: Akola: Jijau Brigade , emphasize on empowerment of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.